Header

Amruta Khanvilkar | अमृता खानविलकरला तिच्या पतीने केलं अनफॉलो; यावर अमृताने केला ‘हा’ मोठा खुलासा

Amruta Khanvilkar | अमृता खानविलकरला तिच्या पतीने केलं अनफॉलो; यावर अमृताने केला ‘हा’ मोठा खुलासा

बहुजननामा ऑनलाईन –  आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar). अभिनयापेक्षाही जास्त तिने तिच्या नृत्याने नेहमीच प्रेक्षकांना आणि तिच्या चाहत्यांना घायाळ केले आहे. ‘नटरंग’ चित्रपटातील ‘वाजले की बारा’ असो वा ‘चंद्रमुखी’तील ‘चंद्रा’ हे गाणे.. अमृताने नेहमीच प्रेक्षकांना ताल धरायला भाग पाडले आहे. अमृता आणि हिमांशू मल्होत्रा या दोघांनी 2015 मध्ये लग्न केलं होतं. त्या दोघांची पहिली भेट 2004 साली झाली होती. या दोघांनी ‘नच बलिये सीझन-7’ या ट्रॉफीवर आपलं नाव कोरल होत. अमृता खानविलकर आणि हिमांशु मल्होत्रा यांच्याकडे नेहमीच क्युट कपल म्हणून पाहिले जाते. मात्र आता अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) तिच्या चाहत्यांना एक धक्का दिला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

‘पटलं तर घ्या विथ जयंती’ हा एक नवीन चॅट शो प्लॅनेट मराठी ओटीटी या मराठी ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर सुरू करण्यात आला आहे. त्यात मराठी कलाकारांशी गप्पा मारल्या जातात. या शोची सुरवात जानेवारीमध्ये झाली. नुकतंच या शोमध्ये अमृता खानविलकरने हजेरी लावली. यावेळी तिच्याबरोबर ‘आदिपुरूष’ चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत देखील होता. या भागाचा एक प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.’पटलं तर घ्या विथ जयंती’मध्ये अमृताने अनेक गोष्टी गंमतीदार किस्से, खटकणाऱ्या गोष्टी शेअर केल्या आहेत. तू तुझ्या नवऱ्याला अनेकदा सोशल मीडियावर ब्लॉक करून टाकतेस, अनफॉलो करतेस हे खरं आहे का? असा प्रश्न अमृताला विचारण्यात आला. त्यावर तिने ‘आता त्याने मला अनफॉलो केलंय’, असं उत्तर दिलं.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

काही महिन्यांपूर्वीच अमृता आणि हिमांशू यांनी आपल्या मित्रमंडळींसोबत जोरदार वाढदिवस साजरा केला होता.
मात्र आता अमृताने (Amruta Khanvilkar)हिमांशुला सोशल मीडियावरून ब्लॉक केले आहे.
त्यामुळे त्यांच्यात सगळं आलबेल आहे की, नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
त्यांच्यात नेमकं काय घडलं, त्यांनी असं का केलं, याचे उत्तर प्रेक्षकांना शुक्रवारी म्हणजेच 10 फेब्रुवारी मिळेल.
माझ्या पप्पांनी मला आतापर्यंत डान्स करताना बघितले नसल्याची खंतही यावेळी अमृताने व्यक्त केली. तसेच अमृता आणि ओम राऊत हे ‘बर्गर बडीज’ असल्याचे गुपितहि तिने यावेळी सांगितले. अमृताने गोलमाल, साडे माडे तीन, गैर, नटरंग, फक्त लढ म्हणा, सतरंगी रे, शाळा, आयना का बायना, धूसर, झकास, अर्जुन, वेलकम जिंदगी, कट्यार काळजात घुसली, आणि डॉ काशिनाथ घाणेकर, वेल डन बेबी,चंद्रमुखी या मराठी चित्रपटांमध्ये आजवर काम केलेले आहे. मराठीचित्रपटासोबतच अमृताने राझी, सत्यमेव जयते आणि मलंग सारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे.

 

 

Web Title :- Amruta Khanvilkar | amruta khanvilkar husband himanshu malhotra unfollow her on social media know details

 

हे देखील वाचा :

Chandrapur Fire News | चंद्रपूरमध्ये कापडाच्या दुकानाला भीषण आग

Pune Crime News | माथाडीच्या नावाखाली खंडणी मागणार्‍यावर गुन्हा दाखल

Pune Crime News | वडिलांच्या मृत्युनंतर ५१ वर्षाच्या सावत्र मुलाने लाटले तब्बल ११ कोटी रुपये; बनावट मेल आयडी तयार करुन केली फसवणूक

 

The post Amruta Khanvilkar | अमृता खानविलकरला तिच्या पतीने केलं अनफॉलो; यावर अमृताने केला ‘हा’ मोठा खुलासा appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article