Header

Ayesha Kapur | ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केले एका निर्मात्यावर धक्कादायक आरोप ; म्हणाली – ‘माझी बायको….”

Ayesha Kapur | ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केले एका निर्मात्यावर धक्कादायक आरोप ; म्हणाली – ‘माझी बायको….”

बहुजननामा ऑनलाईन –  टीव्ही असो किंवा चित्रपट जगात काम मिळणे खूपच कठीण आहे. जर तुमच्या मागे प्रसिद्ध नाव नसेल तर तुम्हाला काम मिळण्यासाठी खूपच कष्ट करावे लागते. याचा प्रत्यय आपण अनेक अभिनेत्रीच्या तोंडातून ऐकलेलेच आहे. आता अशाच पद्धतीचा एक खुलासा अभिनेत्री आयशा कपूरने केला आहे. तिच्या या खुलासाने सध्या सर्वांना धक्का बसला आहे. कधी काळी तिला कास्टिंग काऊचचा सामनाही करावा लागले असल्याचे तिने एका मुलाखती दरम्यान सांगितले आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

‘शेरदिल शेरगिल’ या मालिकेतून टीव्ही इंडस्ट्रीज मध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री आयशा कपूर आज घराघरात पोहोचली आहे. आज आयशा अनेक वेब सिरीज आणि टीव्ही शो मध्ये झळकत आहे. मात्र सुरुवातीच्या काळात तिला काम मिळण्यासाठी खूपच संघर्ष करावा लागला होता. यावेळी बोलताना आयशा म्हणाली, “मला नेहमीच अभिनेत्री व्हायचे होते. मात्र माझ्यासाठी हा प्रवास खूपच खडतर होता. जेव्हा मी सुरुवातीला अनेक लोकांना भेटायचे तेव्हा मला काहींनी चुकीचे मार्गदर्शन दाखवले होते. तर कोणीही स्वतःला कास्टिंग डायरेक्टर म्हणून घ्यायचा आणि माझ्यासमोर उभारायचा मी भोळ्याप्रमाणे त्यांच्यावर विश्वास ठेवायची. मात्र मोठ्या हिमतीने त्या खोट्या लोकांपासून मी स्वतःची सुटका करून घेतली आहे”.

 

 

पुढे बोलताना अभिनेत्री म्हणाली, “एकदा मला मोठा प्रोजेक्ट मिळाला होता. त्यामध्ये मी लीड रोलमध्ये होते.
पण शोच्या निर्मात्याने यावेळी माझ्यासमोर एक अट ठेवली होती.
जर मी त्याच्याशी लग्न केले तरच मला ही भूमिका मिळणार होती.
इतकेच नाही तर माझ्याशी लग्न केलं तर तुला मी मुंबईत लक्झरी लाईफ आणि सर्व सोयी सुविधा देईल.
कष्टाशिवाय तुला प्रसिद्धी आणि पैसा मिळेल असे त्यांचे म्हणणे होते. मात्र मी या गोष्टीला नकार दिला.
या गोष्टीला नकार दिल्याने मला या शोमधून बाहेर काढण्यात आले होते.
इतकेच नाही तर मी जितके दिवस त्या शोमध्ये काम केले त्याचे पैसेही मला मिळाले नव्हते”.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :-   Ayesha Kapur | ayesha kapoor shares her casting couch experience for lead role in serial

 

हे देखील वाचा :

Nysa Devgan | लाल रंगाच्या डीप नेक ड्रेसमध्ये न्यासा दिसते एकदम हॉट

Imran Khan | आमिर खानचा भाचा इम्रान पत्नीपासून विभक्त झाल्यावर ‘या’ अभिनेत्रीला करत आहे डेट; व्हिडिओ व्हायरल

Kiara Advani | विविध प्रकारच्या बिकनीमध्ये बॉलीवूड अभिनेत्री कियारा आडवाणी दिसते एकदम हॉट

 

The post Ayesha Kapur | ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केले एका निर्मात्यावर धक्कादायक आरोप ; म्हणाली – ‘माझी बायको….” appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article