Header

Bigg Boss 16 | बिग बॉसच्या घरात फिनालेपूर्वी ‘हा’ स्पर्धक बाहेर; नाव समोर येताच सगळ्यांनाच बसला धक्का

Bigg Boss 16 | बिग बॉसच्या घरात फिनालेपूर्वी ‘हा’ स्पर्धक बाहेर; नाव समोर येताच सगळ्यांनाच बसला धक्का

बहुजननामा ऑनलाईन टीम – सध्या छोट्या पडद्यावर सर्वांचेच लक्ष वेधून घेणारा शो म्हणजे ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16). बिग बॉस 16 आता शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. फिनालेमध्ये गेलेले टॉप्स स्पर्धकांची नावे समोर आली आहेत. काल नुकताच एका तगड्या स्पर्धकाला घराचा निरोप घ्यावा लागला. त्याच्या जाण्याने घरातल्यांबरोबरच प्रेक्षकांना देखील मोठा धक्का बसला आहे. आता बिग बॉस 16 च्या (Bigg Boss 16) ट्रॉफीवर कोणाचे नाव कोरले जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. हा सीजन मागच्या अनेक सीजन पेक्षाही रंजक असल्याचे मत प्रेक्षकांनी आत्तापर्यंत दिले आहे.

 

बिग बॉस 16 सुरू झाल्यापासून पहिल्या दिवसापासूनच स्पर्धक घरात टिकण्यासाठी चांगलीच कसरत करत असताना दिसत होते. एकमेकांना जबरदस्त टक्कर देताना देखील दिसून आले. यंदा बिग बॉसची ट्रॉफी कोणाच्या हाती लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. काही दिवसांपूर्वी या घरातून सुम्बुल तौकीर खान घराबाहेर पडली. या तिच्या एलिमिनेशनने अनेकांना धक्का बसला होता. त्यातून सावरत असतानाच मिड वीक एव्हिक्शन झाले आणि फिनाले पूर्वीच तगडी स्पर्धक समजली जाणारी अभिनेत्री निम्रत कौर अहुवालिया घरातून बाहेर पडली. निम्रत घराच्या बाहेर पडताच अनेकांना मोठा धक्का बसला. तर निम्रतचे चाहते नाराज असल्याचे देखील दिसत आहे. फिनालेला अवघे काही दिवस शिल्लक असताना हे शॉकिंग एलिमिनेशन झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केल्याचे दिसत आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

बिग बॉसच्या (Bigg Boss 16) घरात पहिल्या दिवसापासूनच स्पर्धकांना बाहेरून मोठा सपोर्ट मिळत होता. त्यांचे सेलिब्रिटी मित्र, कुटुंबीय आणि चाहते सोशल मीडियावर त्यांना प्रोत्साहन देताना दिसून येत होते. आता निम्रत च्या जाण्याने शिव ठाकरे मात्र जास्त भावूक झाल्याचे दिसत आहे. कारण घरात निम्रत आणि शिव ठाकरेची मैत्री सर्वांनाच ठाऊक आहे. निम्रतला घरातून निरोप देताना शिवला अश्रू अनावर झाले होते. आता फिनाले मध्ये गेलेल्या टॉप स्पर्धकांपैकी शिव ठाकरे, अर्चना गौतम, एमसी स्टॅन्ड, शालीन आणि प्रियंका चौधरीचा समावेश आहे. आता या पाच स्पर्धकांमधून विजेतेपद कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

Web Title :- Bigg Boss 16 | bigg boss16 nimrit kaur ahluwalia evicted before finale here are top 5 contestants

 

हे देखील वाचा :

Amrawati Crime News | नैराश्याच्या भरात 24 वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, अमरावतीमधील घटना

Aaditya Thackeray | शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान; म्हणाले…

 

The post Bigg Boss 16 | बिग बॉसच्या घरात फिनालेपूर्वी ‘हा’ स्पर्धक बाहेर; नाव समोर येताच सगळ्यांनाच बसला धक्का appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article