Header

Diary of Vinayak Pandit | डायरी ऑफ विनायक पंडित : २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये मयूर पवार आणि कुणाल वेदपाठक यांना सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक पुरस्कार !

Diary of Vinayak Pandit | डायरी ऑफ विनायक पंडित : २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये मयूर पवार आणि कुणाल वेदपाठक यांना सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक पुरस्कार !

बहुजननामा ऑनलाईन टीम – एका कलाकाराचे भावविश्व साकारणारी फिल्म डायरी ऑफ विनायक पंडित (Diary of Vinayak Pandit), या सिनेमाला २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन हे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. डायरी ऑफ विनायक पंडित (Diary of Vinayak Pandit) या सिनेमासाठी प्रोडक्शन डिझायनर म्हणून मयूर पवार व आर्ट डिरेक्टर म्हणून कुणाल वेदपाठक यांनी काम पाहिले.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

चित्रबोली क्रिएशन्स आणि वन कॅम प्रोडक्शन्स यांची संयुक्त निर्मिती असलेला आणि मयूर शाम करंबळीकर दिग्दर्शित डायरी ऑफ विनायक पंडित हा चित्रपट २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय फेस्टिवल साठी जगभरातून पाठवण्यात आलेल्या १५७४ सिनेमांमधून अंतिम 14 मध्ये निवडण्यात आला होता आणि मराठी स्पर्धात्मक विभागामध्ये अंतिम साथ मध्ये निवडण्यात आला होता.

 

आपल्या भूतकाळात घडलेल्या घटनांमुळे कथेचा नायक म्हणजे विनायक पंडित आपले आयुष्य संपवण्यासाठी निघतो. जसे दिवस पुढे जातात तसे विनायकला एक नवीन आयुष्य जगण्याची संधी मिळते. आणि याच प्रवासामध्ये विनायक एक नवीन भावविश्व बघण्याची संधी प्रेक्षकांना मिळते.

 

चित्रपटात विनायक आपले स्वतःचे अनुभव जसे की नातेसंबंध, वादविवाद त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या नवीन व्यक्तिरेखा जसे की छोटी वर्षा जगदाळे सर आणि इतर हे सर्व विनायक पंडित आपल्या डायरीमध्ये उतरवत असतात. फिल्म ही पूर्ण विनायक पंडित याच्या डायरी भोवती फिरते आणि त्याला आलेले अनुभव हे प्रेक्षकांसमोर सादर करते.

चित्रपटामध्ये मुख्य कलाकार म्हणून अविनाश खेडेकर सुहास शिरसाट पायल जाधव आणि स्वाती काळे यांनी काम केले आहे.
तर संगीतकार म्हणून निरंजन पेडगावकर आणि आनंदी विकास यांनी काम केले आहे.
डायरी ऑफ विनायक पंडित मधीलगाण्यांना पद्मश्री शंकर महादेवन अभय जोधपुरकर मंगेश बोरगावकर जयदीप वैद्य आणि
प्रियांका बर्वे यांनी स्वरसाज चढवला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

उत्तम दिग्दर्शन, सर्व कलाकारांचे दमदार प्रदर्शन उत्तम संगीत याच सोबत उत्तम निर्मिती याची धुरा आदित्य देशमुख आणि
वेदांत मुगळीकर यांनी केली तर सहनिर्माते म्हणून ऋषिकेश जोशी व्यंकट मुळजकर विनय देशमुख आणि
समीर सेनापती यांनी काम पाहिले.

 

3 फेब्रुवारी 2023 आणि 5 फेब्रुवारी 2023 रोजी पार पडलेल्या डायरी ऑफ विनायक पंडितच्या (Diary of Vinayak Pandit)
स्क्रिनिंग ला रसिकांचा सर्वोत्कृष्ट प्रतिसाद लाभला जवळपास 500 हून अधिक लोकांनी हा सिनेमा पाहिला.
21व्या पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये गौरवलेला हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

 

Web Title :- Diary of Vinayak Pandit | Mayur Pawar and Kunal Vedpathak bag awards for Best Production Design and Best Art at the 21st edition of PIFF

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | कोंढव्यातील बंगल्याची तयार केली बनावट कागदपत्रे ; 11 कोटी 80 लाखाच्या फसवणूक प्रकरणी मुद्रिक मर्चंट, परवेज मुर्तुजाला अटक तर फरीदा मर्चंट, अबिद शेख, धनंजय राठोड अन् अस्लम मुजावर विरूध्द FIR

Pune Crime News | व्याजाने दिलेल्या पैशांची ‘पठाणी’ वसुली करणार्‍या तिघा सावकारांविरूध्द गुन्हा; रविंद्र कांबळेला अटक तर आकाश कासट व जमीर कदम वर FIR

 

The post Diary of Vinayak Pandit | डायरी ऑफ विनायक पंडित : २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये मयूर पवार आणि कुणाल वेदपाठक यांना सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक पुरस्कार ! appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article