Header

Mumbai Accident News | चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

Mumbai Accident News | चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन  Mumbai Accident News | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार दुभाजकाला धडकली आणि हा अपघात झाला. यामध्ये कारमधील दोघांचा मृत्यू झाला तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मिरो रोडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. (Mumbai Accident News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

काय घडले नेमके?
अतिवेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. अपघातामध्ये प्रभादेवी येथे राहणारे अशोक मुसळे (वय 71), रमेश मुसळे (वय 51), माधुरी मुसळे (वय 50) आणि रुचिक देसाई (वय 30) हे चौघे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून पालघरला कारने जात होते. यादरम्यान सकवर गावाच्या हद्दीतील पेट्रोल पंपापासून 400 मीटर अंतरावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे कार थेट दुभाजकाला धडकली आणि हा भीषण अपघात झाला. हि धडक एवढी भीषण होती कि यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या कारमधील जखमींना रुग्णालयात दाखल केले असता रमेश मुसळे आणि रुचिक देसाई यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर अशोक मुसळे आणि माधुरी मुसळे या दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर मीरा रोडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Mumbai Accident News)

 

मुंबई-आग्रा महामार्गावर बस व ट्रकचा भीषण अपघात
काही दिवसांपूर्वी मुंबई-आग्रा महामार्गावर बस व ट्रकचा असाच भीषण अपघात झाला होता. मुंबई-आग्रा महामार्गावर उमराने गावाजवळ हा अपघात झाला होता. यामध्ये बसमधील एकूण 40 प्रवाशी जखमी झाले होते. जखमींपैकी 3 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मालेगाव येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या अपघाताप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्य पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली या अपघाताचा पुढील तपास सुरु आहे.

 

 

Web Title :- Mumbai Accident News | two people died in a car accident on the mumbai ahmedabad highway

 

हे देखील वाचा :

Jalgaon Crime News | दुर्दैवी ! पुतणीच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून नातेवाईकांकडे जात असताना काकांचा अपघातात मृत्यू

Kolhapur Crime News | सतत होत असलेल्या भांडणाला वैतागून आरोपी मुलाचा आपल्या आईवडिलांवर प्राणघातक हल्ला; कोल्हापूरमधील घटना

 

The post Mumbai Accident News | चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article