Header

Nagpur ACB Trap | 1 लाखाची लाच घेताना स्थापत्य अभियंत्यासह तीनजण अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Nagpur ACB Trap | 1 लाखाची लाच घेताना स्थापत्य अभियंत्यासह तीनजण अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

लाखांदूर/भंडारा : बहुजननामा ऑनलाईन  शेताची मोक्का पाहणी करुन विकास व छाणणी शुल्क पावती देणे, तसेच रेखांकन मंजुरीसाठी अंतीम शिफारस पुढे पाठवण्यासाठी 1 लाख 10 हजारांची लाच घेताना (Accepting Bribe) नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Nagpur ACB Trap) लाखांदुर नगर पंचायतीमधील तिघांना रंगेहाथ पकडले. लाच घेताना पकडण्यात आलेल्या तिघांमध्ये स्थापत्य अभियंता (Civil Engineer), कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) आणि खासगी वाहन चालकाचा (Private Driver) समावेश आहे. नागपूर एसीबीने (Nagpur ACB Trap) ही कारवाई गुरुवारी (दि.16) मध्यरात्री केली.

 

स्थापत्य अभियंता गजानन मनोहर कराड Gajanan Manohar Karad (वय-28), कनिष्ठ लिपिक विजय राजेश्वर करंडेकर Vijay Rajeshwar Karandekar (वय-40) व खासगी वाहन चालक मुखरण लक्ष्मण देसाई Mukhran Laxman Desai (वय-45) असे लाच घेताना अटक (Arrest) करण्यात आलेल्या लाचखोरांची नावे आहेत. याबाबत लाखांदूर येथील शेतकऱ्याने नागपूर एसीबीकडे (Nagpur ACB Trap) प्रत्यक्ष कार्यालयात हजर राहून तक्रार दिली.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

तक्रारदार यांची लाखांदूर येथे स्वत:च्या मालकीची शेती आहे. त्यांना शेतीचे विकास व छाननी शुल्क पावती व रेखांकन मंजुरीसाठी शिफारस हवी होती. त्यांनी या कामासाठी लाखांदूर नगरपंचायतशी (Lakhandur Nagar Panchayat) संपर्क साधला. काम करुन देण्यासाठी एक लाख दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यांनी नागपूर एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने सापळा रचला. गुरुवारी रात्री तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले. तिघांविरुद्ध लाखांदुर पोलीस ठाण्यात (Lakhandur Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्र, नागपूर, पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर (SP Rahul Maknikar),
अपर पोलीस अधीक्षक मधुकर गिते (Addl SP Madhukar Gite)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक योगिता चाफले (DySP Yogita Chafle),
पोलीस निरीक्षक वर्षा मते (Police Inspector Varsha Mate), पोलीस निरीक्षक आशिष चौधरी (Police Inspector Ashish Chaudhary),
पोलीस अंमलदार अमोल मेंघरे, अनिल बहिरे, अस्मिता मल्लेलवार, हर्षलता भरडकर यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Nagpur ACB Trap | three employees of lakhandur nagar panchayat arrested while accepting bribe in bhandara

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Chinchwad Crime | पाठलाग करुन तरुणीच्या घरात घुसण्याचा प्रयत्न, चार जणांना अटक; महाळुंगे परिसरातील घटना

Nagpur ACB Trap | 20 हजार रुपये लाच घेताना उपजिल्हाधिकाऱ्यासह एक जण अँटी करप्शनच्या जाळ्यात, घटनास्थळी वेगवेगळ्या पाकीटात सापडली लाखोंची रोकड

 

The post Nagpur ACB Trap | 1 लाखाची लाच घेताना स्थापत्य अभियंत्यासह तीनजण अँन्टी करप्शनच्या जाळ्यात appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article