Header

Nagpur Crime News | मायलेकावर काळाचा घाला ! वाढदिवसाची पार्टी आटोपून घरी येताना भिषण अपघात; दोघांचा मृत्यू

Nagpur Crime News | मायलेकावर काळाचा घाला ! वाढदिवसाची पार्टी आटोपून घरी येताना भिषण अपघात; दोघांचा मृत्यू

नागपूर : बहुजननामा ऑनलाईन  Nagpur Crime News | नागपूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये वाढदिवसाची पार्टी (Birthday Party) आटोपून घरी येत असताना रस्ते अपघातात मायलेकांचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे. भरधाव कारने दिलेल्या धडकेत मायलेकरांचा मृत्यू झाला तर एक वृद्ध महिला जखमी झाली आहे. हि धक्कादायक घटना रविवारी रात्री बेलतरोडी पोलिस स्टेशन (Beltarodi Police Station) हद्दीतील वर्धा मार्गावरील खापरी या ठिकाणी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली आहे. (Nagpur Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

काय आहे नेमके प्रकरण?
देवकाबाई महादेवराव पुंजरवार (वय ७२) आणि त्यांचा मुलगा गणेश (वय ५३, दोन्ही रा. सुयोगनगर, अजनी) अशी या अपघातात मृत पावलेल्या मायलेकरांची नावे आहेत. तर सुधाबाई सुधाकर गोरशेट्टीवार (वय ७१, रा. ओमनगर) असे जखमी झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. मृत देवकाबाई यांच्या मुलीची सासू सुधा यांचा रविवारी वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त खापरीतील तृप्ती हॉटेलमध्ये सर्व नातेवाइक जेवायला गेले होते. (Nagpur Crime News)

 

यावेळी सर्वजण रस्ता पार करून कारजवळ जात होते. याचवेळी वर्ध्याकडून येणाऱ्या भरधाव कारने सुधा, गणेश व देवकाबाई या तिघांना जोरदार धडक दिली. या अपघातानंतर आरोपी कारचालक घटनास्थळावरून फरार झाला. या अपघातातील जखमींना एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या अपघाताप्रकरणी कारचालकाविरुद्ध प्राणांतिक अपघाताचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे बेलतरोडी पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

 

बाईक अपघातात बापाच्या डोळ्यादेखत 20 वर्षीय मुलाचा मृत्यू
अमरावतीमध्ये कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर मुलाचे वडील गंभीर जखमी झाले.
हा अपघात शुक्रवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास वलगाव ठाण्याच्या हद्दीतील चांदूरबाजार-शिराळा या महामार्गावर घडला आहे.
यश संजय गोटेकर (20) असे मृत मुलाचे तर संजय अजाबराव गोटेकर (53) असे या अपघातात जखमी झालेल्या वडिलांचे नाव आहे.
याप्रकरणी वलगाव पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :-  Nagpur Crime News | mother and son died in accident while going home after birthday party

 

हे देखील वाचा :

NCP Chief Sharad Pawar | पहाटेच्या शपथविधीवर फडणवीसांचा गौप्यस्फोट, शरद पवार म्हणाले – ‘मला वाटलं देवेंद्र हा सुसंस्कृत माणूस आहे…’

Devendra Fadnavis | पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांसोबत चर्चा झाली होती! देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट

Pune Crime News | पुण्यातील अट्टल गुन्हेगार नाशिक कारागृहात स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP रितेश कुमार यांची 4 थी कारवाई

 

The post Nagpur Crime News | मायलेकावर काळाचा घाला ! वाढदिवसाची पार्टी आटोपून घरी येताना भिषण अपघात; दोघांचा मृत्यू appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article