Header

Pune Crime News | 24 वर्षाच्या तरुणीचा नवले पुलावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न, पुणे पोलीस आणि नागरिकांमुळे तरुणी बचावली

Pune Crime News | 24 वर्षाच्या तरुणीचा नवले पुलावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न, पुणे पोलीस आणि नागरिकांमुळे तरुणी बचावली

पुणे : बहुजननामा ऑनलाईन  Pune Crime News | मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर (Mumbai-Bangalore Bypass) असलेल्या नवले पुलावरुन (Navale Bridge) एका 24 वर्षाच्या तरुणीने उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न (Attempted Suicide) केला. मात्र त्यावेळी कर्तव्यावर हजर असणारे वाहतूक पोलीस (Pune Traffic Police) आणि नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे तरुणी बचावली. हा धक्कादायक प्रकार (Pune Crime News) रविवारी (दि.19) रात्री आठच्या सुमारास घडला. या घटनेत तरुणी जखमी झाली असून तिच्यावर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्राथमिक माहितीनुसार प्रेम प्रकरणातून (Love Affair) तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री आठच्या सुमारास एक तरुणी नवले पुलावरुन जोरात ओरडत होती. ती तरुणी 50 फूट उंचीवरुन खाली उडी मारुन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होती. त्यावेळी नवले पूलाखाली वाहतूकीचे नियमन करणारे वाहतूक पोलीस मिथुन राठोड (Mithun Rathod), अमर कोरडे (Amar Korde) आणि स्थानिक नागरिकांनी हा प्रकार पाहिला. (Pune Crime News)

 

तरुणीला वाचवण्यासाठी काहीजण पुलाच्या दिशेने निघाले. तर प्रसंगावधान राखत पोलीस आणि नागरिकांनी सतरंजी पकडली. पुलावर निघालेले नागरिक तरुणीपर्यंत पोहोचेपर्यंत तिने वरुन उडी मारली.
मात्र पोलीस आणि नागरिकांनी सतरंजी आणि हाताच्या सहायाने तरुणीला झेलत तिचा जीव
(Pune Police Saved Life of Girl) वाचवला.
यामध्ये तरुणी किरकोळ जखमी झाल्याने तिला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

 

 

Web Title :- Pune Crime News | pune police saved life of girl who tries to jump from navle bridge

 

हे देखील वाचा :

MP Sanjay Raut | संजय शिरसाट यांनी संजय राऊतांची तुलना केली पिसाळलेल्या कुत्र्याशी, म्हणेल- ‘इंजेक्शन द्यावं लागेल’

Bhagat Singh Koshyari | पहाटेच्या शपथविधीवर माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे परखड मत, म्हणाले- ‘दोन मोठ्या पक्षाचे नेते माझ्याकडे…’

Maharashtra Politics | आदित्य ठाकरेंची आमदारकी धोक्यात? चिन्ह आणि पक्षाचे नाव मिळाल्यावर शिवसेना शिंदे गट घेणार मोठा निर्णय

 

The post Pune Crime News | 24 वर्षाच्या तरुणीचा नवले पुलावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न, पुणे पोलीस आणि नागरिकांमुळे तरुणी बचावली appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article