Header

Pune Crime News | बलात्काराची तक्रार दिल्याने तरुणाचा अल्पवयीन युवतीच्या घरासमोर धिंगाणा; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात FIR

Pune Crime News | बलात्काराची तक्रार दिल्याने तरुणाचा अल्पवयीन युवतीच्या घरासमोर धिंगाणा; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात FIR

पुणे : बहुजननामा ऑनलाईन Pune Crime News | प्रेमसंबंधातून बलात्कार (Rape in Pune) केल्याने ती अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. तिने एका मुलाला जन्म दिल्यानंतर तिच्या आईच्या तक्रारीवरुन कोंढवा पोलिसांनी (Pune Police) बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आता या नराधमाने तिच्या घरासमोर येऊन धिंगाणा घालून तिचा विनयभंग (Molestation) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

याप्रकरणी सुरज भारत पवार (वय २६, रा. येवलेवाडी, कोंढवा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका १७ वर्षाच्या मुलीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १००/२३) दिली आहे.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांचे पूर्वी प्रेम संबंध होते. त्यातून आरोपीने ती अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. त्यातून फिर्यादी ही गर्भवती राहिली. तिने एका मुलाला जन्म दिला. गेल्या वर्षी जानेवारी २०२२ मध्ये तिच्या आईने फिर्याद दिल्याने सुरज पवार याच्याविरुद्ध पोलिसांनी बलात्कार व पोक्सो अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर फिर्यादी या लोणी काळभोर येथील घरी असताना १ फेब्रुवारी रोजी आरोपी त्यांच्या घरी आला. फिर्यादीचे नाव घेऊन जोर जोरात ओरडून धिंगाडा घातला. फिर्यादीचा पाठलाग केला. त्यामुळे पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

 

Web Title :- Pune Crime News | A young man lynched in front of a minor girl’s house for reporting rape; FIR at Loni Kalbhor Police Station

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | माथाडीच्या नावाखाली खंडणीखोरी करणार्‍यांविरोधात मोहीम; एकाच दिवसात विमानतळ पोलीस ठाण्यात ३ गुन्हे दाखल, दोन महिन्यांनी घेतली दखल

Nashik ACB Trap | 50 हजारांची लाच घेताना भूमी अभिलेखचे अधीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Budget 2023 | ‘हा तर महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार..;’ केंद्रीय बजेटवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची टीका

Kolhapur Police Inspector / API Transfer | कोल्हापूर पोलीस : 18 पोलीस निरीक्षक आणि 5 सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

 

The post Pune Crime News | बलात्काराची तक्रार दिल्याने तरुणाचा अल्पवयीन युवतीच्या घरासमोर धिंगाणा; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात FIR appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article