Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा जिंकण्यासाठी भाजपचा ‘मास्टर प्लॅन’ तयार, ‘या’ महत्त्वाच्या नेत्यांना दिले ‘हे’ आदेश
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Kasba Peth Bypoll Election | भाजपच्या आमदार मुक्ता टिळक (BJP MLA Mukta Tilak) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) चुरशीची लढत होत आहे. महाविकास आघाडीने रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून भाजपसमोर तगडे आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे कसबा पेठ पोटनिवडणूक (Pune Kasba Peth Bypoll Election) भाजपसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. कसब्यात भाजपकडून विशेष खबरदारी घेतली जात असून भाजपचे दिग्गज नेते कसब्यात तळ ठोकून आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
कसबा पेठ मतदारसंघात (Pune Kasba Peth Bypoll Election) 2019 च्या निवडणुकीत मुक्ता टिळक यांचा विजय झाला होता. तर यापूर्वी गिरीश बापट (Girish Bapat) यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. मात्र, आता मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. कसबा हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. यामुळे या पोटनिवडणुकीत भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपने विशेष खबरदारी घेत नेत्यांना पुढचे दोन दिवस कसब्यात तळ ठोकण्याचे आदेश दिले आहेत. कसब्याची जबादारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या खास शिलेदारांवर सोपवण्यात आली आहे.
कसबा पेठ पोटनिवडणुकीची जबाबदारी गिरीश महाजन (Girish Mahajan),
रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan), प्रवीण दरेकर (Praveen Darekar) या भाजपच्या प्रमुख नेत्यांवर सोपवली आहे.
पुढील दोन दिवस सर्व महात्त्वाची कामे बाजूला ठेवून केवळ कसब्यावर लक्ष केंद्रीत करण्याचे आदेश या नेत्यांना दिले आहेत.
तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून भाजपच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात आहेत.
पोटनिवडणुकीच्या मतदानाला फक्त दोन दिवस शिल्लक असल्याने भाजपसोबत महाविकास आघाडीकडून
जोरदार प्रचार केला जात आहे. गुरुवारी (दि.23) ठाकरे गटाचे (Thackeray group)
आमदार आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray) यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Kasba Peth Bypoll Election | bjp prepares master plan for pune kasba by election hemant rasane devendra fadnavis
हे देखील वाचा :
Pune Crime News | बापानेच केला अडीच वर्षाच्या मुलीचा विनयभंग; जाब विचारणार्या पत्नीला केली मारहाण
The post Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा जिंकण्यासाठी भाजपचा ‘मास्टर प्लॅन’ तयार, ‘या’ महत्त्वाच्या नेत्यांना दिले ‘हे’ आदेश appeared first on बहुजननामा.