Pune Pimpri Chinchwad Crime | खून करुन मृतदेह फेकला ओढ्यात, महाळुंगे MIDC परिसरातील घटना
पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन– Pune Pimpri Chinchwad Crime | धारदार हत्याराने वार करुन एका व्यक्तीचा खून (Murder) करून मृतदेह ओढ्यात फेकून दिला. हा प्रकार (Pune Pimpri Chinchwad Crime) शनिवारी (दि.11) दुपारी साडेबाराच्या सुमारास खेड तालुक्यातील (Khed Taluka) देशमुखवाडी गावच्या हद्दीतील बाळु देशमुख यांच्या पडीक शेतजमीनीत उघडकीस आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Mahalunge MIDC Police Station) आयपीसी 302, 201 नुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याबाबत राजु किसन राठोड Raju Kisan Rathod (वय-42 रा. सारा सिटी सोसायटी, खराबवाडी, ता. खेड) यांनी रविवारी (दि.12) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत व्यक्तीची अद्याप ओळख पटली नसून त्याचे अंदाजे वय 40 ते 42 वर्ष
आहे. मयत व्यक्तीवर हत्याराने वार करण्यात आले आहेत.
त्याच्या डोक्यावर व छातीवर मारहाण करुन खून करण्यात आला आहे.
खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह ओढ्यात आणून टाकला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime | Killed and threw the dead body in the stream, incident in Mahalunge MIDC area
हे देखील वाचा :
Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानाचा देवेंद्र फडवीसांनी घेतला समाचार, म्हणाले…
The post Pune Pimpri Chinchwad Crime | खून करुन मृतदेह फेकला ओढ्यात, महाळुंगे MIDC परिसरातील घटना appeared first on बहुजननामा.