Header

RASS Trophy Cricket Tournament | ‘रास करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेचे २४ फेब्रुवारीला आयोजन

RASS Trophy Cricket Tournament | ‘रास करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेचे २४ फेब्रुवारीला आयोजन

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – RASS Trophy Cricket Tournament | रास प्रोजेक्ट कन्सल्टंटस प्रा.लि. तर्फे ‘रास करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ही स्पर्धा २४, २५ व २६ फेब्रुवारी २०२३ रोजी स्पार्क क्रिकेट अ‍ॅकॅडमी, पुनावळे येथे होणार आहे. (RASS Trophy Cricket Tournament)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना रास प्रोजेक्ट कन्सल्टंटस्चे व्यवस्थापकीय संचालक अनिल हिंगे यांनी सांगितले की, औद्योगिक बांधकाम क्षेत्रात काम करणार्‍या कर्मचारी आणि खेळाडूंसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या क्षेत्रात रास करंडक अतिशय प्रतिष्ठेची स्पर्धा गणली जाते. स्पर्धेचे हे सहावे वर्ष असून स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेत एकूण २ लाख रूपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.

 

सुरोज बिल्डकॉन प्रा.लि., स्कॉन प्रोजेक्टस् प्रा लि, एस जे कॉन्ट्रॅक्टस्एस प्रा लि, जीएस पीइबी अँड सिव्हिल वर्क्स प्रा लि, मिलेनियम इंजिनिरर्स अँड काँट्रॅक्टस लि., न्याती इंजिनिअर्स अँड कन्सल्टंटस प्रा.लि., रोहन बिल्डर्स इंडिया प्रा लि, आरकॉन पुणे प्रा लि या ८ संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पहावयास मिळणार आहे. हे सामने साखळी आणि बाद फेरी या पध्दतीमध्ये खेळवण्यात येणार आहे.

 

स्पर्धेतील विजेत्या संघाला १ लाख रूपये पारितोषिक आणि करंडक तर, उपविजेत्या संघाला ५१ हजार रूपये
पारितोषिक आणि करंडक देण्यात येणार आहे.
या शिवाय स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत.
सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांना करंडक व सन्माचिन्ह तर, मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू
याला करंडक आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
तसेच प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर अशी पारितोषिकांची रेलचेल या स्पर्धेत असणार आहे.

गतवर्षी सुर्या इलेव्हन संघाने विजेतेपद तर, सुरोज बिल्डकॉन इलेव्हन संघाने उपविजेतेपद मिळवले होते.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- RASS Trophy Cricket Tournament | RASS Trophy Cricket Tournament Starts On 24 feb

 

हे देखील वाचा :

Mumbai Crime News | इन्स्टा मैत्री पडली महागात ! पोलिसात नोकरी देण्याच्या आमिषाने मित्राने महिलेला 2 लाखात विकले

Thane Crime News | ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ घोषणा दिली म्हणून तरुणांवर गुन्हा दाखल, ठाण्यातील घटना

 

The post RASS Trophy Cricket Tournament | ‘रास करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेचे २४ फेब्रुवारीला आयोजन appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article