Header

Satara News | धक्कादायक ! साताऱ्यात 20 वर्षीय तरूणाचा आढळला मृतदेह

Satara News | धक्कादायक ! साताऱ्यात 20 वर्षीय तरूणाचा आढळला मृतदेह

सातारा : बहुजननामा ऑनलाईन  – Satara News | साताऱ्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये वाई तालुक्यातील परखंदीच्या शिवारात आज सकाळी एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटवली आहे. मृत पावलेल्या 20 वर्षीय तरुणाचे नाव अभिषेक जाधव असे असून तो खानापूर येथील रहिवाशी आहे. (Satara News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

या घटनेमुळे वाई तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. प्रेम प्रकरणातून हि हत्या करण्यात आली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेमुळे खानापूरमध्ये देखील तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळी परखंदी गावातील काही नागरिक हे शेताकडे जात असताना त्यांना अभिषेकचा मृतदेह आढळून आला. यानंतर त्यांनी तातडीने या घटनेची माहिती वाई पोलिसांना दिली. (Satara News)

 

या घटनेची माहिती मिळताच वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, पोलीस उपनिरीक्षक स्नेहल सोमदे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णराव पवार, डीबी पथकाचे विजय शिर्के, श्रावण राठोड, सपोनी आशिष कांबळे,
किरण निंबाळकर, अमित गोळे, प्रसाद दुदुस्कर यांच्यासह सर्व टीम घटनास्थळी पोहोचली.
यानंतर पोलिसांनी मृतदेहाची झडती घेतली असता त्याच्याकडे असलेल्या कागदपत्रावरून त्याची ओळख पटली.
यानंतर पोलिसांनी अभिषेकचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सातारा याठिकाणी पाठवला.
शवविच्छेदनाचा अहवाल आणल्यानंतर पुढील गोष्टी स्पष्ट होतील. वाई पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :-  Satara News | a body of a 20 year old youth has been found in satara parakhandi

 

हे देखील वाचा :

Joginder Sharma | भारताचा वेगवान गोलंदाज जोगिंदर शर्माची क्रिकेटमधून निवृत्ती

Jalna Crime News | नशेच्या भरात पतीकडून पत्नीची निर्घृणपणे हत्या; जालन्यामधील घटना

Pune Pimpri Chinchwad Crime News | अल्पवयीन मुलीशी व आईसोबत गैरवर्तन, फोटो व्हायरल करणाऱ्या आरोपीला अटक; पिंपरी परिसरातील प्रकार

 

The post Satara News | धक्कादायक ! साताऱ्यात 20 वर्षीय तरूणाचा आढळला मृतदेह appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article