Header

Shubman Gill | ‘या’ खेळाडूंना मागे टाकत शुबमन गिल ठरला ICC ‘प्लेअर ऑफ द मंथ’

Shubman Gill | ‘या’ खेळाडूंना मागे टाकत शुबमन गिल ठरला ICC ‘प्लेअर ऑफ द मंथ’

बहुजननामा ऑनलाईन – भारताचा ओपनर युवा फलंदाज शुबमन गिल (Shubman Gill) याने जानेवारी महिन्याचा ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकला आहे. त्याने भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि न्यूझीलंडचा डेव्हन कॉनवे यांना मागे टाकून हा पुरस्कार जिंकला आहे. शुबमन गिलने (Shubman Gill) त्याच्या कामगिरीने सर्वांची मने जिंकली आहेत. जानेवारी महिना त्याच्यासाठी खूप खास होता. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात द्विशतक करत त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. यानंतर गिलने टी-20 मध्येही शतक झळकावले. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर आयसीसीच्या पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले होते.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

या यादीमध्ये शुबमन गिल व्यतिरिक्त, भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि न्यूझीलंडचा यष्टिरक्षक डेव्हॉन कॉनवे यांना प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी मानांकन देण्यात आले होते. त्याने 2023 ची सुरुवात शानदार पद्धतीने केली. या वर्षी त्याने श्रीलंकेविरुद्ध पदार्पण केले. यामध्ये त्याने पहिल्या सामन्यात केवळ 7 धावा केल्या. यानंतर दुसऱ्या सामन्यातदेखील त्याला विशेष कामगिरी करता आली नाही. यानंतर राजकोटमध्ये झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात शुबमनने 46 धावा केल्या.

 

 

टी२० क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी
गिलने या काळात टी-20 क्रिकेटमध्येदेखील आपली चमक दाखवली. त्याने 6 टी-20 सामन्यांमध्ये 40.
40च्या सरासरीने आणि 165.57च्या स्ट्राइक रेटने 202 धावा केल्या. यामध्ये एका शतकाचाही समावेश आहे.
त्याने गेल्या महिन्यात टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. शुबमन गिलने (Shubman Gill) मागच्या महिन्यात 12 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 12 डावांमध्ये 750 हून अधिक धावा केल्या आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

शुबमन गिलने मानले आभार
ICC प्लेयर ऑफ द मंथ ‘किताब जिंकल्यानंतर “ICC पॅनेल आणि जागतिक क्रिकेट चाहत्यांनी ICC पुरूष खेळाडूचा महिना म्हणून मतदान केल्याबद्दल मला आनंद झाला आहे.
जानेवारी हा माझ्यासाठी खास महिना होता आणि हा पुरस्कार जिंकल्याने तो आणखी संस्मरणीय झाला.
या यशाचे श्रेय मी माझ्या सहकाऱ्यांना आणि प्रशिक्षकांना देतो ज्यांनी मला एक खेळाडू म्हणून साथ दिली.
मी माझ्या सहकारी नामांकित व्यक्तींचे त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन करू इच्छितो.
” अशी प्रतिक्रिया देत सगळ्यांचे आभार मानले आहे.

 

 

Web Title :- Shubman Gill | shubman gill became januarys player of the month last month he created history by scoring more than 750 runs

 

हे देखील वाचा :

Sachin Sawant | भाजपकडून शिंदे गटाचा उपयोग फक्त शिवसेना तोडण्यासाठी…; काँग्रेस नेते सचिन सावंतांचा भाजपवर घणाघात

Devendra Fadnavis | सवंग प्रसिद्धीसाठी देवेंद्र फडणवीसांनी ‘ती’ पातळी गाठली – राष्ट्रवादी

Karuna Munde | ‘रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवा’ – करूणा मुंडे

 

The post Shubman Gill | ‘या’ खेळाडूंना मागे टाकत शुबमन गिल ठरला ICC ‘प्लेअर ऑफ द मंथ’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article