Header

Smriti Irani | थाटामाटात पार पडला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या लेकीचे लग्न; लग्नात स्मृती इराणींनी धरला ठेका

Smriti Irani | थाटामाटात पार पडला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या लेकीचे लग्न; लग्नात स्मृती इराणींनी धरला ठेका

बहुजननामा ऑनलाईन – सध्या बॉलीवूडमध्ये लग्नसराई दिसत आहे. नुकताच सिद्धार्थ आणि कियारा यांचा लग्न सोहळा पार पडला. तर आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या लेकीचे लग्न देखील थाटात झाल्याचे दिसत आहे. स्मृती इराणी यांची लेक शनेल लग्न बंधनात अडकली आहे. कॅनडा स्थित असलेल्या अर्जुन भल्ला सोबत स्मृती इराणी (Smriti Irani) यांची लेक लग्न बंधनात अडकली आहे. हा लग्न सोहळा राजस्थान येथील नागौर येथे पार पडला होता.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

शनेल आणि अर्जुनच्या शाही विवाह सोहळ्याला राजस्थानमधील नागौर येथील खिमसार या 500 वर्षे जुन्या किल्ल्यात हा लग्न सोहळा पार पडला. या लग्नाला केवळ मोजकीच मंडळी उपस्थित होते. शनेल आणि अर्जुनच्या लग्न सोहळ्याला इराणी आणि भल्ला कुटुंबीय मोठ्या आनंदात दिसत होते. या लग्न सोहळ्याला राजस्थानी संस्कृती ही थीम देखील ठेवण्यात आली होती. यांच्या लग्न सोहळ्यात राजस्थानी संस्कृतीची झलक पाहायला मिळाली होती. आता सोशल मीडियावर सर्वत्र त्यांच्या लग्नाचे काही फोटोज आणि व्हिडिओज शेअर होताना दिसत आहेत.

 

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी देखील आपल्या लेकीच्या लग्नात खूपच आनंदी दिसत होत्या.
यावेळी त्यांनी ठेका देखील धरला होता. स्मृती इराणी यांचा डान्सचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.
तर स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या लेकीच्या लग्नात केवळ कुटुंबातील सदस्य जवळचे मित्र असे
50 पाहुण्यांनाच आमंत्रण देण्यात आले होते. त्यांच्या लग्नातील शाही थाट सोशल मीडियावर चर्चेचा विषय
बनत आहे. 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान शनेल आणि अर्जुन हे लग्न बंधनात अडकले आहेत.
आता या लग्न सोहळ्याप्रमाणेच शनेल आणि अर्जुनचे रिसेप्शन देखील एका खास ठिकाणी होणार असल्याचे
समोर आले आहे. अद्याप तरी या ठिकाणचे नाव उघडकीस आले नाही.

 

 

Web Title :- Smriti Irani | smriti irani daughter shanelle irani arjun bhalla wedding photo vial social media

 

हे देखील वाचा :

MLA Praniti Shinde | कोण रोहित पवार? काही जणांमध्ये पोरकटपणा असतो, प्रणिती शिंदेंनी उडवली खिल्ली

Rakhi Sawant | राखी सावंतने केला मोठा खुलासा; म्हणाली “मी आदिलसाठी धर्मांतर केल्याचे कळताच आईने…”

Indrani Balan Winter T-20 League | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; न्युट्रीलिशियस्, हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी कामगिरी

 

The post Smriti Irani | थाटामाटात पार पडला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या लेकीचे लग्न; लग्नात स्मृती इराणींनी धरला ठेका appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article