Header

H3N2 Virus | पुण्यात ‘एच3एच2’ मुळे प्रथमच दोघांचा मृत्यू, मृतांमध्ये जेष्ठ नागरिकासह महिलेचा समावेश

H3N2 Virus | पुण्यात ‘एच3एच2’ मुळे प्रथमच दोघांचा मृत्यू, मृतांमध्ये जेष्ठ नागरिकासह महिलेचा समावेश

पुणे : बहुजननामा ऑनलाईन   भारतात सध्या एच3एन2 इन्फ्लुएंझा विषाणूच्या (H3N2 Virus) संसर्गाने चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. पुण्यात ‘ए’ उपप्रकार असलेल्या एच3एच2 च्या विषाणूने (H3N2 Virus) दोघांचा बळी (Death) घेतला आहे. यामध्ये पुण्यातील 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, तर दुसरी बीडमधील 37 वर्षीय महिला आहे. गेल्या 13 दिवसांमध्ये हे दोन मृत्यू झाले असून त्यांचा मृत्यू खासगी रुग्णालयात झाला आहे. मृत झालेल्या दोघांना सहव्याधी होत्या. एच3एन2 मुळे पुण्यात पहिल्यांदाच दोन मृत्यू झाले आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

पुण्यातील कसबा पेठेतील सूर्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये (Surya Sahyadri Hospital) 67 वर्षीय एच3एन2 बाधित (H3N2 Virus) ज्येष्ठ नागरिकावर उपचार सुरु होते.  त्याला उच्च रक्तदाब (High Blood Pressure) आणि मधुमेह (Diabetes) होता. त्याचा 11 मार्च रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर बीडची महिला हडपसर येथील नोबल हॉस्पिटलमध्ये (Noble Hospital) उपचार घेत होती. या महिलेचा 23 मार्च रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेला ऑटोइम्युन डिसीज (Autoimmune Disease), यकृताचा आजार (Liver Disease) व मेंदूत रक्तस्त्राव (Brain Bleeding) झाले होते.

 

पुण्यात एच3एन2 मुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाल्यांनंतर रुग्णांच्या सखोल परीक्षण करण्यासाठी तज्ज्ञांच्या मृत्यू पडताळणी समितीची शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीमध्ये दोन्ही रुग्णावर करण्यात आलेले उपचार, त्यांच्या मृत्यूचे कारण याचे बारकाईने परीक्षण करण्यात आले. त्यावेळी दोघांचाही मृत्यू एच3एन2 मुळे झाल्याचा निष्कर्ष समितीने काढला. तसेच सहव्याधीसह हा व्हायरस देखील मृत्यूला कारणीभूत ठरल्याचे आढळून आले.

 

मृत्यू पडताळणी समितीमध्ये डॉ. नायडू सांसर्गिक रोगांचे रुग्णालय (Dr. Naidu Hospital for Infectious Diseases) सर्वेअलन्स युनिटमधील आरोग्य अधिकारी अध्यक्ष आहेत. या युनिटमध्ये पालिकेतील सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधीर पाटसुते, बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. नरेश सोनकवडे आणि डॉ. एच.बी. प्रसाद, डॉ. कार्तिक जोशी आणि नोबल रुग्णालयातील फिजिशियन डॉ. राज कोद्रे, डॉ. सुजाता गायकवाड आणि डॉ. महेश कुमार यांचा समावेश आहे.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title : H3N2 Virus | For the first time two people died due to ‘H3H2’ in Pune, including a senior citizen and a woman among the dead

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | कोंढवा पोलिसांकडून खुनाचा प्रयत्न करणार्‍याला 4 तासात अटक

Pune Kasba Peth Bypoll Election | पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबाला उमेदवारी का दिली नाही?, चंद्रकांत पाटलांनी केला खुलासा, म्हणाले…

S. Balan Cup T20 League | चौथी ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा; न्युट्रीलिशियस्, हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी सलामी !!

 

The post H3N2 Virus | पुण्यात ‘एच3एच2’ मुळे प्रथमच दोघांचा मृत्यू, मृतांमध्ये जेष्ठ नागरिकासह महिलेचा समावेश appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article