Kasba Bypoll Election Result | ‘मी स्वत: कमी पडलो, आत्मचिंतन करणार’, निकालावर हेमंत रासनेंची प्रतिक्रिया
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Kasba Bypoll Election Result | पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी 11 हजार 40 मतांनी विजय मिळवला. यानंतर भाजपचे (BJP) उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांनी पोटनिवडणुकीत मिळालेल्या पराभवावर बोलतना उमेदवार म्हणून मी स्वत: कमी पडल्याचे सांगितले. तसेच मी कुठे कमी पडलो हे तपासावं लागेल असेही म्हणाले. (Kasba Bypoll Election Result)
हेमंत रासने पुढे म्हणाले, मी बुथवाईज आकडेवारी पाहिल, त्यानंतर, सर्व गोष्टीचं बारकाईनं विश्लेषण करील. मात्र, मी कुठे कमी पडलो ते मी पाहिन. मला आत्मचिंतन करावं लागेल, असेही रासने यांनी सांगितले. पक्षाने मला उमेदवारी दिली, माझ्यावर विश्वास दर्शवला, सर्व यंत्रणा माझ्यासाठी काम करत होती. मात्र केवळ मी उमेदवार म्हणून कमी पडलो, जो निकाल लागला तो मी स्विकार करतो असेही हेमंत रासने यांनी सांगितले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
इतर फॅक्टर बद्दल मला बोलायचं नाही.
पक्षाने मला उमेदवारी देत माझ्यावर विश्वास दाखवला त्यात मी हरलो पात्र ठरलो नाही. निवडणूकीत अनेक फॅक्टर असतात पण जबाबदारी माझीच असते असेही रासने म्हणाले.
2009 पासून मतदार संघाची रचना झाली तेव्हा हा एक लाखाचा कसबा तीन लाखांचा झाला.
पूर्व आणि पश्चिम अशी विभागणी झाली, दोन विचारांचा पगडा असलेला मतदार विभागाला गेला.
या पूर्वीच्या निवडणुका तिरंगी, सहारंगी झाल्या पण ही निवडणूक वन टू वन झाली याचा परिणाम झाला असेल असेही हेमंत रासने म्हणाले.
रासने पुढे म्हणाले, सुरुवातीला पैसे वाटप केल्याचा आरोप झाला.
त्यानंतर नेते आणल्याचा आणि ईव्हीएम मशीनवर आरोप झाला.
आता ईव्हीएम मशीनवर आरोप करणार का तुम्ही? कालपर्यंत तर करत होते.
हे आरोप केले त्याचा थोडाफार फटका मला बसला असे रासने यांनी सांगितले.
Web Title :- Kasba Bypoll Election Result | it is i who fall short somewhere humbly accepting the result frank reaction of bjps hemant rasen
हे देखील वाचा :
The post Kasba Bypoll Election Result | ‘मी स्वत: कमी पडलो, आत्मचिंतन करणार’, निकालावर हेमंत रासनेंची प्रतिक्रिया appeared first on बहुजननामा.