Header

Mumbai Crime News | इमारतीच्या छतावरून उडी घेऊन महिलेची आत्महत्या; मुंबईमधील घटना

Mumbai Crime News | इमारतीच्या छतावरून उडी घेऊन महिलेची आत्महत्या; मुंबईमधील घटना

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन  Mumbai Crime News | मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दादर पश्चिममध्ये इमारतीच्या छतावरून उडी मारून एका महिलेने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. रोहिणी रमेश पाटील (वय 64 वर्ष) असे या वृद्ध महिलेचं नाव आहे. त्यांना म्हतारपणात कर्करोगाने ग्रासल्याने त्या मानसिकरीत्या खचल्या होत्या. यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी दादर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Mumbai Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

काय आहे नेमके प्रकरण?

रोहिणी रमेश पाटील या दादर पश्चिममध्ये असलेल्या वर्तक हॉल समोरील साईकृपा इमारतीत कुटुंबासोबत राहत होत्या. त्या रोज सकाळी सात मजली इमारतीच्या गच्चीवर फेरफटका मारण्यासाठी जात होत्या. घटनेच्या दिवशी त्या नेहमीप्रमाणे इमारतीच्या गच्चीवर गेल्या, मात्र त्यानंतर काही वेळातच त्यांनी इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आपले आयुष्य संपवले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. (Mumbai Crime News)

 

 

जानेवारी महिन्यात शस्त्रक्रिया

त्यांना म्हातारपणी कर्करोग झाला होता. यामुळे त्या तणावात होत्या. त्यांनी अनेकवेळा याची खंत अनेकदा आपल्या कुटुंबाकडे व्यक्त केली होती. त्यांच्यावर जानेवारी महिन्यात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र त्या मानसिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणात खचल्या होत्या. याच मानसिक तणावातून त्यांनी आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मृत रोहिणी यांच्या पश्चात पती, मुलगा सून व नात असा परिवार आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title : Mumbai Crime News | woman suffering from cancer took an extreme step in mumbai

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | दारु पित बसले असल्याचे म्हटल्याने दारुची बाटली फोडली तरुणाच्या डोक्यात; कोंढव्यातील पुण्यधाम आश्रमजवळील मैदानातील घटना

Solapur Crime News | प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

MP Sanjay Raut | भाजपकडून मैत्रीचा हात आला तर युती होणार का? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले

WPL 2023 | WPLमध्ये ‘या’ महिला खेळाडूने झळकावले सर्वात वेगवान अर्धशतक

 

The post Mumbai Crime News | इमारतीच्या छतावरून उडी घेऊन महिलेची आत्महत्या; मुंबईमधील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article