Header

NCP MLA Amol Mitkari | ‘अन् तथाकथित ‘हिंदु जननायक’ परदेश दौऱ्यावर पळाले, त्यामुळे…’, अमोल मिटकरींचा राज ठाकरेंना टोला

NCP MLA Amol Mitkari | ‘अन् तथाकथित ‘हिंदु जननायक’ परदेश दौऱ्यावर पळाले, त्यामुळे…’, अमोल मिटकरींचा राज ठाकरेंना टोला

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन  मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात (Padwa Melava) राज ठाकरे यांनी हिंदू बांधवांना रामनवमी जोरात साजरी करण्याचे आवाहन केले होते. आज देशभरात रामनवमी (Ram Navami) उत्साहात साजरी केली जात आहे. मात्र राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) स्वत: परदेश दौऱ्यावर गेले आहेत. यावरुन राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. यावेळी अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) यांनी राज ठाकरेंचा उल्लेख तथाकथित ‘हिंदू जननायक’ असा केला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

अमोल मिटकरी यांनी ट्विट करुन राज ठाकरे यांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत निशाणा साधला आहे. मिटकरी ट्विटमध्ये म्हणाले, रामनवमी साजरी करण्याचा आदेश देऊन स्वत: मात्र यामध्ये सहभागी नसणारे तथाकथित ‘हिंदू जननायक’ परदेश दौऱ्यावर पळाले. त्यामुळे आता रामनवमी बिचाऱ्या कार्यकर्त्यांनाच साजरी करायची आहे. याला म्हणतात, हंस चुगेगा दाना तिनका, कौआ मोती खायेगा.

 

 

 

काय म्हणाले होते राज ठाकरे?

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना हिंदू बांधवांनी रामनवमी जोरात साजरी करावी,
असे आवाहन केले होते. तसेच एकदा राज्य माझ्या हातात द्या, मी सगळा महाराष्ट्र सुतासारखा सरळ करेन.
कुणीही यावे आणि टपली मारुन जावे, हे चालणार नाही. माझ्या तमाम हिंदू बांधवांना माझी विनंती आहे,
यंदा रामनवमी जोरात साजरी करा. 6 जूनला शिवछत्रपतींच्या राज्यभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत आहेत.
मी रायगडावर जाणार आहे. तुम्ही सर्वांनी दक्ष रहा, सावध रहा असे राज ठाकरे म्हणाले होते.
यावरुन अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे.  आता यावर मनसे कशा प्रकारे उत्तर देते हे पाहणे महत्त्वाचे ठरले.

 

 

Web Title :-   NCP MLA Amol Mitkari | ncp mla amol mitkari criticise mns chief raj thackeray over ramnavami celebration tweet

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | मुंढव्यात 16 वर्षीय मुलीला ब्लॅकमेल करून बलात्कार, 20 वर्षीय युवकास अटक

MP Imtiaz jaleel | छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा, इम्तियाज जलील यांनी राम मंदिरातून केलं शांत राहण्याचं आव्हान (व्हिडिओ)

Expressions 2023 | ‘एक्स्प्रेशन्स २०२३’ महोत्सवला चांगला प्रतिसाद; भारती विद्यापीठ आयएमईडी मध्ये यशस्वी आयोजन

Modi Hatao, Desh Bachao | आम आदमी पक्षातर्फे आज देशभरात ‘मोदी हटवा, देश वाचवा’ पोस्टर लावण्याची मोहीम

 

The post NCP MLA Amol Mitkari | ‘अन् तथाकथित ‘हिंदु जननायक’ परदेश दौऱ्यावर पळाले, त्यामुळे…’, अमोल मिटकरींचा राज ठाकरेंना टोला appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article