Header

Pune Crime News | धक्कादायक ! पत्नी व 8 वर्षाच्या मुलाचा खून करून पतीची आत्महत्या, टीसीएसमध्ये होता कामाला

Pune Crime News | धक्कादायक ! पत्नी व 8 वर्षाच्या मुलाचा खून करून पतीची आत्महत्या, टीसीएसमध्ये होता कामाला

पुणे : बहुजननामा ऑनलाईन  Pune Crime News | पुण्याच्या औंध परिसरातील (Aundh, Pune) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 44 वर्षीय व्यक्तीने स्वतःच्या पत्नीचा आणि 8 वर्षाच्या मुलाचा खून (Murder In Pune) करून स्वतः आत्महत्या (Suicide In Pune) केल्याची माहिती समोर आली आहे. हा धक्कादायक प्रकार बुधवारी दुपारी उघडकीस आला आहे. दरम्यान, हे तिघे हरविल्याची तक्रार चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात (Chaturshringi Police Station) मंगळवारी रात्री दाखल झाली होती. (Pune Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

सुदिप्तो गांगुली Sudipto Ganguly Pune (44, रा. औंध) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. त्याने पत्नी प्रियांका सुदिप्तो गांगुली Priyanka Sudipto Ganguly (वय. 40 ) आणि मुलगा तनिष्क सुदिप्तो गांगुली Tanishk Sudipto Ganguly (वय. 08) चा खून करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यातील अधिकार्‍यांनी वर्तविला आहे. गांगुली हा मंगळवारी रात्री फोन उचलत नव्हता. त्याचा बेंगलोर येथील भाऊ मित्रांकरवी शोधा-शोध करीत होता. अखेर मंगळवारी रात्री त्यांनी सुदिप्तो आणि त्याची पत्नी व मुलगा हरविल्याची तक्रार चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात दिली. बुधवारी सकाळी सुदिप्तोचा भाऊ पुण्यात आला.

 

बुधवारी दुपारी पोलिसांनी सुदिप्तो गांगुली यांचे औंध परिसरातील घर गाठले असता त्यांना घरात 3 मृतदेह आढळून आले आहेत. सुदिप्तोच्या मुलाच्या आणि पत्नीच्या तोंडाला पॉलिथीनची बॅग बांधलेली दिसून आली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत. मात्र, सुदिप्तोने पत्नी आणि मुलाचा खून करून स्वतः गळफास घेवून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे. सुदिप्तोने कोणत्या कारणामुळे असे पाऊल उचलले याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. (Pune Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

सुदिप्तो गांगुला हा टीसीएस कंपनीमध्ये आयटीआय अभियंता म्हणून कामाला असल्याची माहिती मिळाली आहे मात्र तो टीसीएसमध्ये नेमक्या कोणत्या पदावर कामाला होता याबाबत अधिक माहिती मिळाली नाही.

 

 

Web Title :  Pune Crime News | Shocking! Husband committed suicide by killing his wife and 8-year-old son, was working in TCS

 

हे देखील वाचा :

Police Accident News | उभ्या ट्रकला धडकल्याने पोलिसचा दुर्देवी मृत्यू

Mangal Prabhat Lodha In Vidhan Sabha | पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील मालोजीराजे भोसले पर्यटन विकास आराखड्यासाठी 2 कोटी रुपये मंजूर करून हे स्थळ पर्यटन स्थळ म्हणून घोषित करणार

Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे राज्यातली आरोग्य यंत्रणा कोलमडली; सरकारने तातडीने हस्तक्षेप करुन संपावर तोडगा काढावा – अजित पवार

 

The post Pune Crime News | धक्कादायक ! पत्नी व 8 वर्षाच्या मुलाचा खून करून पतीची आत्महत्या, टीसीएसमध्ये होता कामाला appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article