Header

Pune Crime News | रंगपंचमी खेळताना वादातून तरुणावर कोयत्याने केले वार; धनकवडीतील बालाजीनगरमधील घटना

Pune Crime News | रंगपंचमी खेळताना वादातून तरुणावर कोयत्याने केले वार; धनकवडीतील बालाजीनगरमधील घटना

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | रंगपंचमी साजरी करीत असताना एकमेकांकडे पाहण्यावरुन टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करुन लाथाबुक्क्यांनी मारुन गंभीर जखमी केले. (Pune Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याप्रकरणी अक्षय शांतीनाथ दिवाणे (वय २४, रा. संतोषनगर, कात्रज) याने सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakarnagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७७/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शॅन्डी शेंडकर, राजकुमार परेदशी, ऋषी भगत, अल्ताफ शेख, सुफियान शेख, दिनेश फाळके व त्यांचे साथीदार (सर्व रा. बालाजीनगर, धनकवडी) यांच्यावर खूनाचा प्रयत्न (Attempted Murder) केल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. ही घटना धनकवडीतील बालाजीनगर (Balajinagar, Dhankawadi News) येथील तोरणा हाईटस समोर रविवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व तिचा मित्र जय पवार, ओम पवार हे रंगपंचमी साजरी
करत असताना त्यांच्या ओळखीचे आरोपी तेथे आले. त्यांनी ओम पवार याला तू कोठे राहतो, येथे काय करतो,
असे म्हणून विनाकारण वाद करुन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ओम याला ते मारहाण (Beating)
करु लागले. तेव्हा त्याला सोडविण्यासाठी फिर्यादी व जय पवार गेले असताना त्यांना फरशीने हाताने व
लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. फिर्यादी यांना वाचविण्यासाठी आलेल्या इतर नागरिकांना हत्यारे
दाखवून दहशत निर्माण केली. पोलीस उपनिरीक्षक मुलाणी तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime News | A young man was stabbed by a coyote due to an argument while playing Rangpanchami; Incident at Balajinagar in Dhankawadi

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | घटस्फोटासाठी अर्ज केल्याच्या रागातून पतीने पेट्रोल टाकून जाळली वाहने; कोंढव्यातील घटनेत कार, रिक्षासह 4 दुचाकी जळून खाक

Parbhani Crime News | कल्याण ते निर्मल राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात शाळेसाठी निघालेल्या दोन शिक्षकांचा मृत्यू

Jalna Crime News | हिंगोलीतील जवानाचा गावी परतताना रेल्वेतून पडून मृत्यू; लेकीला पाहण्याची इच्छा राहिली अपूर्ण

 

The post Pune Crime News | रंगपंचमी खेळताना वादातून तरुणावर कोयत्याने केले वार; धनकवडीतील बालाजीनगरमधील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article