Header

Pune Crime News | आईनेच केला पोटच्या ४ वर्षाच्या मुलीचा चाकूने भोसकून खून; हडपसरमधील ससाणेनगर येथील धक्कादायक घटना

Pune Crime News | आईनेच केला पोटच्या ४ वर्षाच्या मुलीचा चाकूने भोसकून खून; हडपसरमधील ससाणेनगर येथील धक्कादायक घटना

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | आईने आपल्या ४ वर्षाच्या मुलीच्या पोटात चाकू खुपसून तिचा खून (Murder In Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी रात्री उघडकीस आला आहे. (Pune Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

वैष्णवी महेश वाडेर (Vaishnavi Mahesh Vader) असे या दुदैवी मुलीचे नाव आहे. याप्रकरणी तिची आई कल्पी वाडेर (Kalpi Vader) हिला हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) ताब्यात घेतले आहे. ही घटना ससाणेनगर येथील सिद्धीविनायक दुर्वांकुर सोसायटीत घडली. तिने आपल्याच मुलीला का मारले याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला आपल्या मुलीसह या सोसायटीत ४ मार्च रोजी राहण्यास आली होती. त्यापूर्वी ती प्रतिकनगरमध्ये रहात होती.
ती बेकरी प्रॉडक्ट घरीच बनवून विक्रीचा व्यवसाय करते. ती सोमवारी हे भाड्याचे घर खाली करणार होते.
त्यामुळे घरमालक तेथे गेले, तेव्हा घर आतून बंद होते. शेजारच्या महिलेला त्यांनी दरवाजा उघडण्यास सांगितले.
तिने दरवाजा वाजविल्यावर या महिलेने दरवाजा उघडला.
पण त्यांच्याशी काही बोलली नाही. तेव्हा त्यांनी घरात जाऊन पाहिल्यावर तिची मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत
पडलेली दिसली. त्यांनी तत्काळ ही माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली.
हडपसर पोलिसांनी (Pune Police) महिलेला ताब्यात घेतले आहे. या महिलेच्या नातेवाईकांची माहिती घेण्याचे काम पोलीस करीत आहेत.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Pune Crime News | 4-year-old daughter stabbed to death by mother; A shocking incident at Sasanenagar in Hadapsar

 

हे देखील वाचा :

Amruta Fadnavis | अमृता फडणवीस धमकी प्रकरणातील आरोपी अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर

Congress Leader Rahul Gandhi | लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर राहुल गांधींना दुसरा धक्का! ‘सरकारी निवारा’ही जाणार

Cricketer Kedar Jadhav’s Father Missing | क्रिकेटर केदार जाधवचे वडिल पुण्यातून बेपत्ता, पुण्याच्या अलंकार पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार

TORK Motors | टॉर्क मोटर्स पुणे डीलरशिपने वितरित केल्या 50 मोटारसायकल्स

 

The post Pune Crime News | आईनेच केला पोटच्या ४ वर्षाच्या मुलीचा चाकूने भोसकून खून; हडपसरमधील ससाणेनगर येथील धक्कादायक घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article