Pune News | युवराज ढमालेंसह भागीदारांकडून महापालिका व रहिवाशांची फसवणूक झाल्याचा आरोप; बेकायदेशीर बांधकामावर कारवाईची मागणी, कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune News | कोंढवा येथील (Kondhwa News) राजगृही बिझनेस हब (Rajgruhi Business Hub In Kondhwa) कमर्शियल प्रिमायसेस सहकारी संस्थेची इमारत युवराज ढमाले (Yuvraj Dhamale), विकी संघवी व इतर विकासकांनी बांधली आहे. येथील रहिवाशांना फ्लॅट दिला मात्र पार्किंग चा रॅम्प नसल्याने त्यांना पार्किंग वापरता येत नाही. तसेच पार्किंगच्या जागेत बेकायदेशिरपणे जिम व हॉटेलचा व्यवसाय सुरू केल्याचा आरोप आहे. त्यामुळे महापालिकेने Pune Municipal Corporation (PMC) या बेकायदेशीर कामावर व महापालिकेची फसवणूक करणाऱ्या या विकासकांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तुषार पाटील (Tushar Patil), माजी नगरसेवक शंकर पवार Shankar Pawar), राहुल भंडारे (Rahul Bhandare), पिंटू धाडवे (Pintu Dhadve) यांनी केली आहे. (Pune News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
येथील बेकायदेशीर बांधकामाचा आणि हॉटेल व्यवसायाचा राजगृही सोसायटी मधील रहिवाशांना खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे. रविलाल प्रजापती यांनी या अगोदर याप्रकरणी तक्रार अर्ज देखील दिला होता. मात्र, महापालिकेने अद्याप त्यावर कारवाई केली नाही. (Pune News)
राजगृही बिझनेस हब कमर्शियल प्रिमायसेस सहकारी संस्थेच्या इमारतीच्या समोर बांधलेल्या
कमर्शियल इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर चारचाकी पार्किंगच्या जागेवर बेकायदेशीरपणे जिम सुरू केली आहे. तर, पाचव्या मजल्यावर दुचाकी पार्किंग असताना त्याजागी हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे.
कोंढवा बुद्रुक (Kondhwa Budhruk) येथील सर्व्हे नंबर 62/1/2/1 आणि 62/1/2/2 या जागेत हा
राजगृही प्रकल्प आहे. या प्रकल्पावर त्वरित कायदेशीर कारवाई करावी. तेथील स्थानिक रहिवाशांना या
बेकायदेशीर कामामुळे होत असलेला त्रास लक्षात घेता ताबडतोब कारवाई होणे आवश्यक आहे.
येत्या 2 ते 3 दिवसात कारवाई झाली नाही तर, आम्ही कायदेशीर मार्गाने आंदोलन करू, असा इशाराही तुषार पाटील,
शंकर पवार, राहुल भंडारे व पिंटू धाडवे यांनी दिला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune News | Allegations of defrauding the municipality (Pune PMC) and residents by partners including Yuvraj Dhamale; Demand action on illegal construction, warning of agitation if no action is taken
हे देखील वाचा :
उन्हाळ्यात Back Acne मुळं परेशान असाल तर ‘हे’ घरगुती उपाय करा, डाग देखील होतील ‘क्लिअर’; जाणून घ्या
Pune Crime News | 34 वर्षीय पोलिस कर्मचार्याची गळफास घेऊन आत्महत्या, प्रचंड खळबळ
The post Pune News | युवराज ढमालेंसह भागीदारांकडून महापालिका व रहिवाशांची फसवणूक झाल्याचा आरोप; बेकायदेशीर बांधकामावर कारवाईची मागणी, कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा appeared first on बहुजननामा.