Header

Pune Water Supply | गुरुवारी शहरातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

Pune Water Supply | गुरुवारी शहरातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे : बहुजननामा ऑनलाईन  Pune Water Supply | शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखली जलशुद्धीकरण केंद्रामध्ये (Chikhli Water Treatment Plant) फ्लो मीटर बसवण्याचे, पर्वती ते एसएनडीटी (SNDT) दरम्यानच्या अस्तित्वातील 1 हजार 200 मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून होणारी गळती रोखणे आणि चतु:श्रृंगी येथील पाण्याच्या टाकीची वाहिनी मुख्य जलवाहिनीला जोडण्याच्या कामामुळे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा (Pune Water Supply) गुरुवारी (दि.23) बंद राहणार आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

तर शुक्रवारी (दि. 24) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा (Pune Water Supply) होण्याची शक्यता आहे. अशी माहिती पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर (Chief Engineer Anirudh Pawaskar) यांनी दिली.

 

पाणीपुरवठा बंद असणारा भाग

चतु:श्रृंगी टाकीवरुन होणारा पाणीपुरवठा – औंध, बोपोडी, औंध रोड, खडकीचा काही भाग (पुणे मुंबई महामार्ग), अभिमानश्री सोसायटी, विधाते वस्ती, आय.टी.आय रोड, पंचवटी, कस्तुरबा वसाहत, सिद्धार्थ नगर, औंध गाव, पुणे विद्यापीठ परिसर, भाऊ पाटील रोड, बाणेर रोड परिसर, भोईटे वस्ती, सिंध सोसायटी, सानेवाडी, आनंद पार्क, नागरस रोड, आय.सी.एस. कॉलनी भोसले नगर, इंदिरा वसाहत, सकाळ नगर, अनगळ पार्क, राजभवन

 

चिखली जलशुद्धीकरण केंद्रावरुन होणारा पाणीपुरवठा – गणेश नगर बोपखेल, म्हस्के वस्ती, आळंदी रोड, टिंगरेनगर,
आदर्श कॉलनी, बर्माशेल झोपडपट्टी, पुणे एअर पोर्ट लोहगांव, राजीव गांधी नगर (नॉर्थ आणि साऊथ), विमाननगर,
यमुनानगर, श्रीपार्क सोसायटी, दिनकर पठारे वस्ती, ठुबे पठारे नगर, खराडी बायपास रोड या भागाचा
पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे.

 

 

Web Title :-  Pune Water Supply | Water supply to ‘this’ part of the city will be closed on Thursday

 

हे देखील वाचा :

The Dark Shadow Motion Pictures | समर क्वीन, किंग, प्रिन्स, प्रिन्सेस सौंदर्य स्पर्धेचे आयोजन; विजय पाटकर, जयवंत वाडकर, स्मिता गोंदकर, गायक उत्कर्ष शिंदे असे अनेक दिग्गज लावणार हजेरी

Nashik Crime News | अज्ञात महिलेने घरात घुसून आईला बेशुद्ध करून 3 महिन्यांच्या मुलीची केली हत्या, नाशिकमधील घटना

Dr. Mhaske Hospital & Research Center – Hadapsar, Pune | डॉ. म्हस्के हॉस्पिटलमध्ये एकाच छताखाली अत्याधुनिक सुविधा ! हडपसरमध्ये इंटीग्रेटेड सर्जिकल केअर सेंटरचे उद्घाटन

 

The post Pune Water Supply | गुरुवारी शहरातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article