Header

Sakinaka Fire News | मुंबईतील साकीनाका परिसरात अग्नितांडव, दुकानाला लागलेल्या भीषण आगीत दोन कामगारांचा होरपळून मृत्यू; 9 जण थोडक्यात बचावले

Sakinaka Fire News | मुंबईतील साकीनाका परिसरात अग्नितांडव, दुकानाला लागलेल्या भीषण आगीत दोन कामगारांचा होरपळून मृत्यू; 9 जण थोडक्यात बचावले

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन Sakinaka Fire News | मुंबईतील साकीनाका परिसरातील एका दुकानाला लागलेल्या भीषण आगीत दोन कामगारांचा होरपळून मृत्यू (Workers Death) झाल्याची घटना (Sakinaka Fire News) घडली आहे. आगीची ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ज्यावेळी दुकानाला आग (Shop Fire) लागली त्यावेळी दुकानात 11 कामगार झोपले होते. यातील नऊ कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, साकीनाका परिसरात असलेल्या राजश्री इलेक्ट्रिक अँड हार्डवेअर (Rajshree Electric & Hardware) या दुकानाला मध्यरात्री दोनच्या सुमारास अचानक आग (Sakinaka Fire News) लागली. दुकानातून आगीचे लोळ उठलेले पाहून स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती अग्निशमन दलाला (Fire Brigade) दिली. अग्निमशन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन 11 कामगारांना बाहेर काढले. या घटनेत 2 कामगार होरपळल्यामुळे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. राकेश गुप्ता (वय-22) आणि गणेश देवासी (वय-23) अशी मृत्यू झालेल्या दोन कामगारांची नाव आहेत.

 

 

विझलेली आग पुन्हा भडकली

आग लागल्याची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यांनी अथक प्रयत्न करुन साडेतीनच्या सुमारास आग नियंत्रणात आणली.
त्यानंतर पाच वाजता पुन्हा आगीचा भडका उडाला. या आगीत दोन दुकानं जळून खाक झाली.
यानंतर पुन्हा काही वेळाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. त्यानंतर याठिकाणी कुलिंगचे काम करण्यात आले.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

कोट्यवधी रुपयांचे नुकसान

मुंबई अग्निशमन दलाने ही आग लेव्हल-1 असल्याचं घोषित केलं आहे.
दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.
या आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालं आहे.
मुंबईतील मोठं हार्डवेअर दुकान म्हणून या दुकानाची ओळख होती.
या आगीत दुकानातील इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन्स आणि इतर साहित्य जळून खाक झालं आहे.

 

 

Web Title : Sakinaka Fire News | a fire broke out at a hardware shop in sakinaka area of mumbai death of 2 workers

 

हे देखील वाचा :

MNS Leader Sandeep Deshpande | राहुल गांधींना इशारा देणाऱ्या उद्धव ठाकरेंना मनसेचा टोला, म्हणाले-‘…की घरी बसून अंडी उबवणार?’

RSF Fitness Club | आर.एस.एफ फिटनेस क्लब आता पुण्यात ! सुप्रसिद्ध अभिनेते, बॉडीबिल्डर ठाकूर अनुप सिंग यांच्या हस्ते उद्घाटन

Pradhan Mantri Formalisation of Micro Food Processing Enterprises (PMFME) Scheme | प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना: सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीतून रोजगार निर्मिती !

 

The post Sakinaka Fire News | मुंबईतील साकीनाका परिसरात अग्नितांडव, दुकानाला लागलेल्या भीषण आगीत दोन कामगारांचा होरपळून मृत्यू; 9 जण थोडक्यात बचावले appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article