Sangli Caste Issue | खत खरेदी करताना शेतकऱ्यांना जात विचारली? राज्य सरकारने केला खुलासा
सांगलीत शेतकऱ्यांना खतविक्रेत्यांकडून रासायनिक खत खरेदीच्या आधी त्याची जात कोणती हे विचारले जात आहे. खताची खरेदी करताना जात सांगण्याची गरज काय (Sangli Caste Issue) असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला होता. यावर राज्याच्या कृषी विभागाने उत्तर दिले आहे. ही जात नाही तर वर्गवारी (Categories) असल्याचे कृषी विभागाने (Department of Agriculture) म्हटले आहे. तसेच केंद्र सरकारने पॉस मशीनचे नवीन 3.2 सॉफ्टवेअर अपडेट केले आहे. त्यात वर्गवारी हा घटक दिला असून कुणाचीही जात विचारली जात नाही, असा खुलासा कृषी विभागाने केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
वर्गवारी कशासाठी विचारली जाते याचे स्पष्टिकरण देताना कृषी विभागाने म्हटले की, प्रत्येक वर्गवारीला
लाभ मिळतो की नाही, पाहण्यासाठी केवळ वर्गवारी दिली आहे. जनरल, SC, ST, OBC अशा केवळ वर्गवारी
त्यात आहेत. सर्वांना लाभ मिळावा असा हा हेतू आहे. शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी
राज्य सरकारने एक पत्र केंद्र सरकारला पाठवून याबाबत समाधानकारक तोडगा काढण्याची विनंती केली
असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.
Web Title : Sangli Caste Issue | agriculture department clarify on why caste catagory in e pos new update
हे देखील वाचा :
Jayant Patil | खतासाठी शेतकऱ्यांना जात विचारणे अत्यंत दुर्दैवी : जयंत पाटील
The post Sangli Caste Issue | खत खरेदी करताना शेतकऱ्यांना जात विचारली? राज्य सरकारने केला खुलासा appeared first on बहुजननामा.