Header

Satara Crime News | अल्पवयीन मुलीची घरीच प्रसूती करुन अर्भकाचे शीर केले धडावेगळे; पिडित मुलीच्या बापासह अत्याचार करणाराही गजाआड

Satara Crime News | अल्पवयीन मुलीची घरीच प्रसूती करुन अर्भकाचे शीर केले धडावेगळे; पिडित मुलीच्या बापासह अत्याचार करणाराही गजाआड

कराड : बहुजननामा ऑनलाईन – Satara Crime News | लैंगिक अत्याचारात साडे आठ महिन्यांची गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मुलीची घरीच प्रसूती करण्यात आली. जन्मलेल्या बाळाचे शीर धडावेगळे करुन ते नाल्यामध्ये टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अत्याचार करणार्‍याला पकडल्यानंतर डॉक्टरांच्या तपासणीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी पिडित मुलीच्या बापालाही अटक केली आहे. (Satara Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख (IPS Sameer Shaikh) यांनी दिली. ढेबेवाडी परिसरातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता. मुलीला त्रास होत असल्याने तिच्या आईवडिलांनी तिला रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी ती ८ महिने २१ दिवसांची गर्भवती असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे (Satara Police) धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली. गुन्हा दाखल केल्यानंतर आईवडिल मुलीला घेऊन घरी गेले. (Satara Crime News)

 

काही दिवसांनी पोलिसांनी मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले. तेव्हा मुलीच्या पोटात गर्भच नसल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांना दिसून आले. त्यांनी ही बाब पोलिसांना सांगितल्यावर ते चक्रावून गेले. त्यानंतर या अल्पवयीन मुलीला पोलिसांनी विश्वासघात घेऊन चौकशी करण्यास सुरुवात केली. तेव्हा या धक्कादायक प्रकार समोर आला.

 

मुलगी घरात असताना तिला प्रसूती वेदना सुरु झाल्या. त्यामुळे तिच्या वडिलांनी तिची घरीच प्रसूती केली.
तसेच जन्मलेले बाळ रडत असल्यामुळे शेजार्‍यांना काही समजायला नको, म्हणून वडिलांनी बाळाचे तोंड दाबले.
ते इतके जोरात दाबले की, त्याचा श्वासच थांबला. त्यानंतर तिच्या वडिलांनी त्याचे शीर धडावेगळे करुन ते नाल्यामध्ये टाकले. मुलीकडून हा प्रकार समजल्यावर पोलिसांनी मुलीच्या बापावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :  Satara Crime News | A minor girl was delivered at home and the infant’s head was beheaded. The father of the victim girl along with the abuser also arrest

 

हे देखील वाचा :

MNS Chief Raj Thackeray | ‘सर्वच क्षेत्रामंध्ये स्त्रियांची जी घौडदौड सुरु, आता त्यांनी…’, महिलादिनी राज ठाकरेंनी केलं ‘हे’ आवाहन

Pune Crime News | सोशल मिडीयासाठी रिल्स बनविताना धडक दिल्याने महिलेचा मृत्यु; दोघांविरुद्ध गुन्हा

 

The post Satara Crime News | अल्पवयीन मुलीची घरीच प्रसूती करुन अर्भकाचे शीर केले धडावेगळे; पिडित मुलीच्या बापासह अत्याचार करणाराही गजाआड appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article