Header

Uddhav Thackeray | राज ठाकरेंच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे खोचक शब्दांत प्रत्युत्तर, म्हणाले- ‘जशी स्क्रिप्ट आली, तशी…’

Uddhav Thackeray | राज ठाकरेंच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे खोचक शब्दांत प्रत्युत्तर, म्हणाले- ‘जशी स्क्रिप्ट आली, तशी…’

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन   –  मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी बुधवारी पाडवा मेळाव्यात (MNS Padwa Melava) बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला होता. तसेच शिवसेनेतून (Shivsena) आपल्याला बाहेर पडण्यासाठी जाणूनबुजून प्रयत्न केले गेल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. राज ठाकरे यांच्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. जशी स्क्रिप्ट आली असेल तशी त्यांनी वाचली असेल असा टोला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लगावला.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

राज ठाकरे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, गेल्या 18 वर्षांत तीच रेकॉर्ड घासून-पुसून झाली आहे. गेल्या वर्षी 14 मे ला वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये (Bandra-Kurla Complex) झालेल्या सभेत मी माझं मत मांडलं होतं. तेव्हा मी एका चित्रपटाचा दाखला दिला होता. त्याच चित्रपटाचा दाखला तुम्ही बघू शकता, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. मात्र त्यांनी चित्रपटाच्या नावाचा उल्लेख केला नाही.

 

माहिमच्या समुद्रातील अनधिकृत बांधकामाबाबत (Mahim Sea Unauthorized Construction) बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ते बांधकाम काही नवीन नव्हतं. त्याच्या आधीही त्याठिकाणी इतर पक्षाचे आमदार होते, त्यांच्याही पक्षाचे आमदार-नगरसेवक होते. त्याच्या आधीपासूनच ते बांधकाम होतं. ठीक आहे, जशी स्क्रिप्ट आली असेल, तसं त्यांनी वाचलं असेल. नाहीतर एवढी वर्ष कारवाई होत नाही आणि आता तातडीने कारवाई होत असेल तर मग राज्यात असणाऱ्या अशा अनेक गोष्टी त्यांना कळवा. ते पत्र लिहितील आणि कारवाई होईल, असा टोला त्यांनी लगावला.

 

बंद दाराआड चर्चेचा विषय आलातर बघू

यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis यांच्यासोबतच्या भेटीबाबत भाष्य केलं.
ते म्हणाले, पूर्वी खुलेपणा होता. पण हल्ली बंद दाराआड होणारी चर्चा अधिक फलदायी ठरतात, असे दिसतेय.
जर भविष्यात बंद दाराआड चर्चेचा विषय आला तर बघू, असेही ते म्हणाले. तसेच मराठी भाषा भवन
(Marathi Bhasha Bhavan) बांधण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. गेल्यावर्षी भूमिपूजन केले.
मात्र अद्याप एकही विट रचली गेली नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Uddhav Thackeray | shivsena uddhav thackeray mocks raj thackeray speech mns padva melawa

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics News | उध्दवजी अजूनही काही बिघडलेलं नाही, पुन्हा एकदा शांतपणे विचार करा; ठाकरेंना सभागृहातच ऑफर

MLA Ashish Shelar | ‘तुमच्यात हिंमत असेल तर…’, आशिष शेलारांचं सभागृहात बाळासाहेब थोरातांना आव्हान (व्हिडिओ)

WhatsApp Feature | WhatsApp वर नवीन फिचर, वाढणार ग्रुप Admin ची पॉवर; मिळणार ‘हे’ विशेष अधिकार

 

The post Uddhav Thackeray | राज ठाकरेंच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे खोचक शब्दांत प्रत्युत्तर, म्हणाले- ‘जशी स्क्रिप्ट आली, तशी…’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article