Header

Ajit Pawar | नागपूरमधील मविआच्या ‘वज्रमूठ’ सभेत अजित पवार भाषण करणार नाहीत, स्वत:च केला खुलासा; राजकीय चर्चांना उधाण

Ajit Pawar | नागपूरमधील मविआच्या ‘वज्रमूठ’ सभेत अजित पवार भाषण करणार नाहीत, स्वत:च केला खुलासा; राजकीय चर्चांना उधाण

नागपूर : बहुजननामा ऑनलाईन  महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा (MVA Vajramuth Sabha Nagpur) आज नागपूरमध्ये होत आहे. ही दुसरी सभा असून या सभेत अजित पवार (Ajit Pawar) बोलणार का? असा सवाल राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे. अशातच अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावर भाष्य करताना आपण आजच्या सभेत भाषण करणार नसल्याचे स्पष्ट केलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात (Maharashtra Political News) उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

मविआच्या वज्रमूठ सभेसाठी अजित पवार (Ajit Pawar) नागपूरात आले आहेत. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आज होणाऱ्या सभेत आपण भाषण करणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच भाषण न करण्या मागचे कारण देखील अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

 

आज नागपूर येथे सभा होणार आहे. यानंतर नाशिक आणि कोल्हापूर येथे वज्रमूठ सभा पार पडणार आहे. माझ्यासंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू आहे. मी भाषण करणार की नाही असे प्रश्न उपस्थित होतायत. तर प्रत्येक पक्षाच्या दोन मान्यवरांनी भाषण करायचं असं ठरलं आहे. कोणी दोघांनी भाषण करायचं ते पक्षान ठरवायचं आहे.

 

मागच्या सभेत काँग्रेसकडून (Congress) बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि अशोक चव्हाण (Ashok Chavan),
शिवसेनेकडून (Shiv Sena) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire)
आणि राष्ट्रवादीकडून (NCP) मी आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी भाषण केलं होतं.

 

तर आज होणाऱ्या सभेत आमच्याकडून जयंत पाटील (Jayant Patil) आणि अनिल देशमुख (Anil Deshmukh) भाषण करणार आहेत.
देशमुख हे विदर्भातील नेते आहेत. पाटील हे पक्षाचे प्रांतध्यक्ष आहेत. काँग्रेसकडून नाना पटोले आणि सुनील केदार (Sunil Kedar) हे बहुतेक भाषण करतील. मर्यादित वेळेत भाषण जनतेला ऐकायला मिळावे हा या मागचा हेतू असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar big statement not speech in mahavikas aghadi vajramuth sabha nagpur

 

हे देखील वाचा :

DY Patil University | डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी : ‘होनहार भारत -पोटँशियल युनिकॉर्नस ऑफ इंडिया’ विषयावरील परिषदेला चांगला प्रतिसाद; उद्यमशील कंपन्या, नवउद्योजकांना ‘होनहार भारत’ पुरस्कार प्रदान

Ajit Pawar | ‘माझ्यावर एवढं प्रेम का ऊतू चाललंय, तेच कळेना’, अजित पवारांची मिश्किल टिप्पणी

Vijay Shivtare On Ajit Pawar | अजित पवार भाजपमध्ये येणार हे कोणाला आवडणार नाही, त्यांनी शिवसेनेत यावं; विजय शिवतारेंचे खुलं आमंत्रण

PM Formalisation of Micro Food Processing Enterprises Scheme (PMFME) | पुणे : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्र अग्रेसर ! देशात सर्वाधिक 6 हजार 592 वैयक्तिक प्रकल्पांना मंजुरी

 

The post Ajit Pawar | नागपूरमधील मविआच्या ‘वज्रमूठ’ सभेत अजित पवार भाषण करणार नाहीत, स्वत:च केला खुलासा; राजकीय चर्चांना उधाण appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article