Chandrashekhar Bawankule | अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशावर बावनकुळेंचे सूचक वक्तव्य, म्हणाले…
नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पुन्हा एकादा महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) निशाणा साधला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Congress Leader Ashok Chavan) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. 2024 पर्यंत आपल्याला महाराष्ट्राचे चित्र बदलेलं दिसेल, असं सूचक विधान त्यांनी केलं आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) पुढे म्हणाले, ठाकरे गटाचे (Thackeray Group) काही लोक येत आहेत, येणारा लहान नेता आहे की मोठा हा प्रश्न नाही. ठाकरे गटातील नेते रोज त्यांना सोडून चालले हे महत्त्वाचं असल्याचे त्यांनी म्हटले. काल अशोक चव्हाण यांच्या चेहऱ्यावरून तुम्हाला लक्षात आले असेल की, कालच्या सभेत त्यांना मोठी खुर्ची मिळाली नाही. सभेत काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीचा (NCP) अपमान झाला. त्यांचे कार्यकर्ते सभेतून निघून गेले, असेही बावनकुळे म्हणाले.
LIVE |
नागपूर | माध्यमांशी संवाद https://t.co/GuWv5WVYMb
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) April 3, 2023
मविआची बोंबाबोंब सभा
मविआच्या सभेबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले, सभेत उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) आक्रोश पाहून असे म्हणता येईल की ही बोंबाबोंब सभा होती.
कालच्या भाषणात खोटारडेपणाचा कळस होता.
तुमच्या घरातील 40 लोक निघून जातात आणि तुम्ही अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीका करता.
तुमची उंची तितकी आहे का असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला.
पुण्यातील पोस्टबाजीवर प्रतिक्रिया
पुण्याचे खासदार गिरीश बापट (Pune MP Girish Bapat) यांचे निधन होऊन दोन दिवस होत नाहीत, तोच पुण्यात भाजपच्या शहराध्यक्ष मुळीक यांचे भावी खासदार म्हणून पोस्टर लावण्यात आले.
यावरुन विरोधकांनी भाजपवर टीकास्त्र सोडले जात आहे.
यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, बापट यांना जाऊन काही दिवसच झाले आहेत, त्यामुळे आता या पोटनिवडणुकीवर चर्चा होणं हे पटण्यासारखे नाही.
उत्साहाच्या भरात कार्यकर्त्यांनी ते पोस्टर लावले, परंतु असा उत्साहीपणा योग्य नाही, त्यांना समज दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Chandrashekhar Bawankule | ashok chavana will join bjp chandrasekhar bawankules reaction
हे देखील वाचा :
Chandrakant Patil | पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कचरा संकलन वाहनांचे लोकार्पण
Rahul Gandhi | राहुल गांधींना सूरत कोर्टाकडून जामीन मंजूर, खासरदारकी पुन्हा मिळणार?
The post Chandrashekhar Bawankule | अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशावर बावनकुळेंचे सूचक वक्तव्य, म्हणाले… appeared first on बहुजननामा.