Header

Maharashtra Mahavitaran Electricity Bill Hike | सर्वसामान्यांना मोठा झटका ! वीज दरात मोठ्या प्रमाणात वाढ; जाणून घ्या नवे दर

Maharashtra Mahavitaran Electricity Bill Hike | सर्वसामान्यांना मोठा झटका ! वीज दरात मोठ्या प्रमाणात वाढ; जाणून घ्या नवे दर

बहुजननामा ऑनलाईन – Maharashtra Mahavitaran Electricity Bill Hike | नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील जनतेला मोठा धक्का बसला आहे. आजपासून वीज दरात वाढ (Maharashtra Mahavitaran Electricity Bill Hike) करण्यात आली आहे. त्यामुळे लोकांना आता अधिक वीज वापरासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

महाराष्ट्र वीज नियामक आयोग (Maharashtra Electricity Regulatory Commission) म्हणजेच MERC ने आजपासून म्हणजेच 1
एप्रिल 2023 पासून नवीन दर लागू केले आहेत. राज्यात वीज वितरणच्या प्रामुख्याने चार कंपन्या आहेत. MSEDCL म्हणजेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (Maharashtra State Power Distribution Company Limited) राज्य सरकारद्वारे चालवली जाते. ही महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची उपकंपनी आहे. चला तर मग जाणून घेऊया वीज वितरण करणाऱ्या कंपन्यांचे नवीन दर… (Maharashtra Mahavitaran Electricity Bill Hike)

 

 

1) महावितरणचे नवीन दर :
महावितरण (Mahavitran) कंपनीने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 2.9 टक्के आणि 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 5.6 टक्के वाढ
केली आहे. त्यामुळे आता आर्थिक वर्ष 2025 पर्यंत निवासी विजेच्या दरात 6 टक्के वाढ झाली आहे.
आर्थिक वर्ष 2024 मध्ये औद्योगिक वीज दर 1 टक्के आणि आर्थिक वर्ष 2025 मध्ये 4 टक्के वाढले आहेत.

 

 

2) टाटा पॉवरचा नवा दर :
टाटा पॉवरने (Tata Power) 2023-24 या आर्थिक वर्षासाठी दर 11.9 टक्के आणि 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 12.2 टक्के
वाढवले आहेत. त्यामुळे आता या दरवाढीमुळे निवासी विजेच्या वीज दरात आर्थिक वर्ष 2024 मध्ये 10 टक्के आणि आर्थिक वर्ष 2025
मध्ये 21 टक्के वाढ झाली आहे. उद्योगासाठी, आर्थिक वर्ष 2024 मध्ये 11 टक्के आणि आर्थिक वर्ष 2025 मध्ये 17 टक्क्यांनी दर
वाढण्यात आले आहेत.

 

 

3) अदानी विजेचे नवीन दर :
अदानी (Adani) वीजदराबद्दल बोलायचे झाल्यास 2023-24 या आर्थिक वर्षासाठी दर 2.2 टक्के आणि 2024-25 या आर्थिक वर्षासाठी
2.1 टक्के वाढवले आहेत. त्यामुळे आता या दरवाढीमुळे निवासी वीज दर आर्थिक वर्ष 2024 मध्ये 5 टक्के आणि आर्थिक वर्ष 2025 मध्ये
2 टक्क्यांनी वाढला आहे. उद्योगासाठी, आर्थिक वर्ष 2024 आणि 2025 मध्ये विजेच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

4) बेस्टचे नवीन दर :
बेस्ट अर्थात बृहन्मुंबई वीज पुरवठा परिवहनने (Brihanmumbai Power Supply Transport) 2023-24 या आर्थिक वर्षासाठी
दर 5.1 टक्के आणि 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 6.3 टक्के वाढवले आहेत.
आता या दरवाढीमुळे निवासी वीज दर आर्थिक वर्ष 2024 मध्ये 6.19 टक्के आणि आर्थिक वर्ष 2025 मध्ये 6.7 टक्क्यांनी वाढला आहे.

 

 

Web Title :-   Maharashtra Mahavitaran Electricity Bill Hike | maharashtra electricity prices are to increase by 5 10 from today details here

 

हे देखील वाचा :

Ceratec Group | रिअल इस्टेटच्या तेजीसोबत ग्रेनाइट आणि मार्बलच्या मागणीत 10 टक्क्यांहून अधिक वाढ

Ratnagiri Accident News | रस्त्यावरून चालताना दुचाकीने दिलेल्या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू

New Gold Hallmark | सोने खरेदी-विक्रीच्या नियमात आजपासून होणार बदल; नवीन हॉलमार्क होणार लागू

 

The post Maharashtra Mahavitaran Electricity Bill Hike | सर्वसामान्यांना मोठा झटका ! वीज दरात मोठ्या प्रमाणात वाढ; जाणून घ्या नवे दर appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article