Header

Maharashtra Political News | ‘कोणतंही लग्न व्हायचं असेल तर..’, अजित पवारांच्या सरकारसोबत जाण्यासंदर्भात गुलाबराव पाटलांचे सूचक विधान

Maharashtra Political News | ‘कोणतंही लग्न व्हायचं असेल तर..’, अजित पवारांच्या सरकारसोबत जाण्यासंदर्भात गुलाबराव पाटलांचे सूचक विधान

जळगाव : बहुजननामा ऑनलाईन Maharashtra Political News | मागील काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे शिंदे गट (Shinde Group) आणि भाजपसोबत सरकारमध्ये (BJP Government) जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मध्यंतरी अजित पवार नॉट रिचेबल असल्याची अफवा पसरली होती. परंतु त्यानंतर स्वत: अजित पवार यांनी यावर खुलासा (Maharashtra Political News) करुन चर्चांना पूर्णविराम दिला होता. मात्र, आता पुन्हा एकदा अजित पवार मविआतून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरु झाली असून त्यावर गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी सूचक विधान केलं आहे. ते जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

लग्न व्हायचं असेल तर तिथीची गरज असते
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार हे युतीत येणार असल्याची चर्चा जोरात सुरु आहे. दरम्यान, अजित पवारांसोबत बरेच आमदार असून कोणतेही लग्न व्हायचं असेल तर तिथीची गरज असते. मात्र त्यासाठी अजून कुळ बघावं लागले. गुण जुळवावे लागतील. नंतरच ते काम करावं लागेल असे वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं आहे. गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. (Gulabrao Patil On Ajit Pawar)

 

सध्या अजित पवार राष्ट्रवादीचेच
यावेळी अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे (Maharashtra Political News) किती आमदार असतील? असा प्रश्न गुलाबराव पाटील यांना विचारला. यावर उत्तर देताना, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचं सांगितले. सध्या अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेस आहेत. ते म्हणतील तो आकडा बनेल, असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं.

 

अजित पवारांबाबत नेत्यांचे दावे-प्रतिदावे
अजित पवार सरकारमध्ये सामिल होणार असल्याच्या चर्चांमध्ये राजकीय नेतेमंडळी वेगवेगळे दावे करुन या चर्चांना खतपाणी घालताना दिसत आहेत. रिपाईंचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी तर अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर देऊ केली आहे. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटाकाडून वेगवेगळे दावे केले जात असताना संजय राऊतांनी (Sanjay Raut) मात्र, अजित पवार प्रमुख नेते आहेत, ते असे पाऊल उचलणार नाहीत, असे विधान केले आहे. याच पार्श्वभूमीवर गुलाबवराव पाटील यांनी सूचक विधान केले आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Maharashtra Political News | maharashtra minister gulabrao patil comment on ncp leader ajit pawar in jalgaon bjp govt

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Chinchwad Crime | IPL क्रिकेट मॅचवर सट्टा घेणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल, एकाला अटक; आरोपींमध्ये बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा समावेश असल्याची चर्चा

Pune Crime News | पर्वती : अश्लील फोटो पतीला दाखविण्याची धमकी, 26 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाविरूध्द गुन्हा

Prakash Ambedkar | महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घडामोड, प्रकाश आंबेडकर तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

 

The post Maharashtra Political News | ‘कोणतंही लग्न व्हायचं असेल तर..’, अजित पवारांच्या सरकारसोबत जाण्यासंदर्भात गुलाबराव पाटलांचे सूचक विधान appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article