Header

Maharashtra Political News | शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचं शिबिर, प्रसिद्धीपत्रकात अजित पवारांचे नाव वगळल्याने चर्चांना उधाण

Maharashtra Political News | शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचं शिबिर, प्रसिद्धीपत्रकात अजित पवारांचे नाव वगळल्याने चर्चांना उधाण

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन  Maharashtra Political News | मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपसोबत (BJP) जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, मंगळवारी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे म्हटलं. (Maharashtra Political News) असे असले तरी राष्ट्रवादीमध्ये सर्व आलबेल असल्याचे दिसत नाही. उद्या राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाचे विभागीय शिबीर (Divisional Camp) होणार आहे. या शिबीराच्या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीपत्रकात अजित पवार यांचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या मुंबई विभागाचं शिबीर होणार आहे. शिबीराच्या कार्यक्रमाच्या  प्रसिद्धीपत्रकात (Maharashtra Political News) अजित पवारांचे नाव नसल्याने ते शिबीराला उपस्थित राहणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अजित पवार यांचा उद्या (शुक्रवार) पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) पूर्वनियोजित कार्यक्रम आहे. त्यामुळे अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 

पत्रकार परिषदेत अजित पवार काय म्हणाले?

कारण नसताना माझ्याबाबत जाणीवपूर्क गैरसमज निर्माण करण्याचे काम केले जात आहे. या बातम्यांमध्ये काही तथ्य नसल्याचे सांगितले.
आता या गोष्टीचा तुकडा पाडा, कारण नसताना गैरसमज करु देऊ नका. 40 सह्या झालेल्या नाहीत आणि घेतलेल्या नाहीत. जी  संभ्रमावस्था निर्माण केली जातेय, ती थांबवा. आमची सहनशिलता संपते, त्याचा अंत होऊ देऊ नका अशी विनंती अजित पवार यांनी केली. जीवात जीव आहे तोपर्यंत पक्षाचे काम करत राहणार असल्याचे अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र आता पुन्हा एकदा पवार शिबीराला उपस्थित राहणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

 

Web Title :- Maharashtra Political News | ajit pawar is likely to be absent from ncps camp in mumbai

 

हे देखील वाचा :

Chowk Marathi Movie Teaser Release | ‘एकच गेम वाजवणार, आख्खा जिल्हा गाजवणार’, ‘चौक’चा टीझर रिलीज

Pune Crime News | पुराव्या अभावी खुनातील आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

Kharghar Heat Stroke | खारघरमधील 14 पैकी 12 जणांच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासा, पोस्ट मॉर्टम अहवालामुळे खळबळ

Gulabrao Patil | ‘चौकटीत राहून बोलावं, नाहीतर पाचोऱ्याच्या सभेत घसून…’, गुलाबराव पाटलांचा इशारा

 

The post Maharashtra Political News | शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचं शिबिर, प्रसिद्धीपत्रकात अजित पवारांचे नाव वगळल्याने चर्चांना उधाण appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article