Nana Patole | ‘… तर काँग्रेसचा प्लान तयार’, नाना पटोलेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – 2024 मध्ये महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) होईल की नाही? हे आत्ताच कसं काय सांगू? असं विधान राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी केलं आहे. यासंदर्भातील चर्चा संपत नाहीत तोच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष (Congress State President) नाना पटोले (Nana Patole) यांनी एक विधान केले आहे की, महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही त्याच दिशेने जात आहोत मात्र महाविकास आघाडी झाली नाही तर आमचा प्लान तयार असल्याचे नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितले. नाना पटोले यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे.
…तर आमचा प्लान तयार आहे
नाना पटोले (Nana Patole) पुढे म्हणाले की, आज निवडणूक होत नाही त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार? त्यासंदर्भात चर्चा आत्ता करत नाही. निवडणूक झाल्यावर ज्यांचे आमदार जास्त त्यांचाच मुख्यमंत्री होईल. आमचा प्रयत्न महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढण्याचा आहे. परंतु जर 2024 ला महाविकास आघाडी झाली नाही तर आमचा प्लान तयार असल्याचे पटोले म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
भाजपचे 105 आमदार चुकून आले
महाराष्ट्रातल्या लोकांनी चुकून भाजपाला (BJP) 105 आमदार निवडून दिले. राज्यात कधी नाही ती परिस्थिती निर्माण झाली. भाजपचे आमदार जास्त प्रमाणात निवडून दिले ही जनतेची चूक होती, असं नाना पटोले यांनी सांगितले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. संख्याबळाच्या आधारे प्यादी चालवण्याचं काम भाजपाकडून सुरु आहे. परंतु हे फार काळ चालणार नाही असंही पटोले यांनी सांगितले.
Web Title :- Nana Patole | if mahavikas aaghadi breaks congress plan is ready said nana patole
हे देखील वाचा :
Chandrakant Patil | ‘… पण मी पालकमंत्री म्हणून पाणी सोडता येत नाही’ – चंद्रकांत पाटील (व्हिडिओ)
The post Nana Patole | ‘… तर काँग्रेसचा प्लान तयार’, नाना पटोलेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण appeared first on बहुजननामा.