Header

Pune Crime News | पुणे-सिंहगड रोड क्राईम न्यूज : नवजात अर्भकाला हॉस्पिटलच्या खिडकीतून फेकून दिल्याने मृत्यु; 19 वर्षाच्या तरुणीचे धक्कादायक कृत्य

Pune Crime News | पुणे-सिंहगड रोड क्राईम न्यूज : नवजात अर्भकाला हॉस्पिटलच्या खिडकीतून फेकून दिल्याने मृत्यु; 19 वर्षाच्या तरुणीचे धक्कादायक कृत्य

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | सिंहगड रोडवरील नवले हॉस्पिटलमध्ये (Navale Hospital, Sinhagad Road) उपचार घेण्यासाठी एक अविवाहित तरुणी आली. पेशंटच्या टॉयलेटमध्ये जाऊन तिने एका मुलीला जन्म दिला. त्या नवजात अर्भकाला तिने बाथरुमच्या खिडकीतून बाहेर फेकून दिल्याने तिचा मृत्यु झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

हा प्रकार नर्‍हे येथील श्री काशीबाई नवले हॉस्पिटलमधील (Smt Kashibai Navale Medical College And General Hospital) कॅज्युअल्टी वॉर्ड शेजारील रुग्णांच्या बाथरुममध्ये शनिवारी सकाळी साडेदहा वाजता घडला.

 

याप्रकरणी नंदा ढवळे (वय ६२, रा. बाणेर) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात Sinhagad Road Police Station (गु. रजि. नं. १६५/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहणार्‍या एका १९ वर्षाच्या तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी १९ वर्षाची तरुणी मानाजीनगर येथील हॉस्टेलमध्ये राहते. शारीरीक संबंधातून (Physical Relationship) ती ८ महिन्यांची गर्भवती राहिली होती. तिने ही बाब सर्वांपासून लपवून ठेवली होती. तिच्या पोटात दुखू लागल्याने ती नवले हॉस्पिटलमध्ये आली. पाठीचे दुखणे व अशक्तपणा आल्याची तक्रार तिने केली. आपण ८ महिन्यांची गर्भवती असल्याचे तिने लपवून ठेवले. त्यानंतर ती हॉस्पिटलच्या कॅज्युअल्टी वॉर्ड शेजारील पेशंटच्या टॉयलेटमध्ये गेली. तेथे तिने एका मुलीला जन्म दिला. त्या नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाला तिने टॉयलेटच्या खिडकीतून बाहेर फेकून दिले. त्यामुळे या अर्भकाचा मृत्यु झाला. या तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक लाड तपास करीत आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :-  Pune Crime News | Pune-Singhgad Road Crime News : Newborn dies after being thrown from hospital window; The shocking act of a 19-year-old girl

 

हे देखील वाचा :

Jayant Patil | राज्यातील सरकार स्थिर…, अजित पवारांच्या विधानावर जयंत पाटील म्हणाले…

National Commission for Minorities – Iqbal Singh Lalpura | देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्वांनी मिळून काम करावे; राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबाल सिंह लालपुरा

MVA Vajramuth Sabha | ‘वज्रमूठ सभे आधीच काँग्रेसमधील नाराजी चव्हाट्यावर’, ‘या’ दिग्गज नेत्याची दांडी

Maharashtra Political News | अजित पवारांसह ‘या’ दोन नेत्यांची अमित शहांबरोबर बैठक झाली, शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा दावा

The post Pune Crime News | पुणे-सिंहगड रोड क्राईम न्यूज : नवजात अर्भकाला हॉस्पिटलच्या खिडकीतून फेकून दिल्याने मृत्यु; 19 वर्षाच्या तरुणीचे धक्कादायक कृत्य appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article