Header

Pune Crime News | खळबळजनक! महिलेसह 2 मुलांचा खून करुन मृतदेह टाकले जाळून; कोंढव्यातील घटना

Pune Crime News | खळबळजनक! महिलेसह 2 मुलांचा खून करुन मृतदेह टाकले जाळून; कोंढव्यातील घटना

पुणे : बहुजननामा ऑनलाईन  Pune Crime News | चारित्र्याचा संशय घेऊन एका तरुणाने बरोबर राहणार्‍या महिलेचा व तिच्या दोन मुलांचा गळा दाबून खून केला व त्यानंतर तिचा मृतदेह जाळून टाकण्याचा धक्कादायक प्रकार कोंढाव्यात (Kondhwa) समोर आला आहे. (Pune Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याबाबत कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) वैभव रुपसेन वाघमारे (वय ३०, रा. पिसोळी, मुळ रा. लोहोटा, ता. औसा, जि. लातूर) याला अटक केली आहे.

 

आम्रपाली वाघमारे (वय २५), रोशनी (वय ६), आदित्य (वय ४) अशी खून केलेल्या तिघांची नावे आहेत. ही घटना पिसोळी येथील शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. समीर साहेबराव मासाळ (वय ३४, रा. पिसोळी) यांनी फिर्याद दिली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  समीर मासाळ यांची पिसोळीत शेती आहे. (Pune Crime News)

 

शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये गेल्या १ वर्षापासून वैभव वाघमारे हा केअर टेकर म्हणून  रहात आहे. त्याच्याबरोबर त्याच्या नात्यातील आम्रपाली वाघमारे व तिची दोन मुलेही होती. बुधवारी रात्री शेतात आग लागल्याचे दिसल्याने नागरिकांनी फोन करुन कळविले. पोलीस, अग्निशामन दलाचे जवान तातडीने तेथे पोहचले. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.

 

आम्रपाली हिचे दुसर्‍या पुरुषांशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन त्यांच्यात वाद झाला होता. त्या रागाच्या भरात वैभव याने आम्रपाली व तिच्या दोन लहान मुलांचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन घरातील कपडे, बेडशीड व लाकडे यांच्या सहाय्याने मृतदेहांना आग लावून ते जाळले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक पोलीस आयुक्त पोर्णिमा तावरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, संजय मोगले यांनी घटनास्थळाला भेट दिली. आरोपीला अटक करण्यात आली असून कोंढवा पोलीस तपास करीत आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :  Pune Crime News | Exciting! 2 children including a woman were killed and the bodies were burnt; Incident in Kondhwa

 

हे देखील वाचा :

Aaditya Thackeray | जाहिर सभेत आदित्य ठाकरेंचं भाकीत, म्हणाले- ‘हे सरकार काही तासांचे’

Devendra Fadnavis | जलवाहतूक व्यवस्थापनात नेदरलँड्सचे सहकार्य महत्त्वाचे ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Supreme Court | ED, CBI विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली, काँग्रेस-शिवसेनेसह 14 विरोधी पक्षांना कोर्टाचा दणका

 

The post Pune Crime News | खळबळजनक! महिलेसह 2 मुलांचा खून करुन मृतदेह टाकले जाळून; कोंढव्यातील घटना appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article