Pune Crime News | पोलीस असल्याचे सांगून तिघा चोरट्यांनी नेले अमेरिकन डॉलर चोरुन; गांजा बाळगल्याचे सांगत बॅग तपासणी करुन हातचलाखी
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | जेवण झाल्यानंतर घरी परत असताना तिघा चोरट्यांनी पोलीस असल्याचे सांगून हँडबॅगमध्ये गांजा (Marijuana) बाळगल्याचा आरोप करुन तपासणीसाठी बॅग घेतली. हातचलाखी करुन त्यांनी बॅगेतील ४ हजार अमेरिकन डॉलर (American Dollar) चोरुन नेले. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी मिठानगर येथे राहणार्या एका ५८ वर्षाच्या नागरिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३८४/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कोंढव्यातील पारगेनगरमधील वेलकम हॉल चौकात ९ एप्रिल रोजी रात्री १० वाजता घडला. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची पत्नी अरबिया रेस्टॉरंट (Arabia Restaurant)
येथे रात्रीचे जेवण करुन परत जात होते. वेलकम हॉल चौकात चालत आले. तेव्हा तिघे जण कारमधून तेथे आले.
त्यांच्यापैकी एकाने आयडेंटिटी कार्ड दाखवून पोलीस असल्याचे सांगितले.
त्यांच्याजवळच्या बॅगेत हशीश असल्याचे सांगत चेकिंगसाठी फिर्यादीकडील हँडबॅग घेतली.
बॅग चेक करीत असल्याचा बहाणा करुन हातचलाखी करुन त्यातील ४ हजार अमेरिकन डॉलर
(अंदोज ३ लाख २० हजार रुपये) चोरुन तिघे निघून गेले.
कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime News | Stealing US dollars by three thieves claiming to be policemen; After checking the bag, they said that they were carrying ganja
हे देखील वाचा :
Sanjay Dutt Injured | शुटिंग दरम्यान जखमी झाल्याने संजय दत्त रूग्णालयात दाखल
The post Pune Crime News | पोलीस असल्याचे सांगून तिघा चोरट्यांनी नेले अमेरिकन डॉलर चोरुन; गांजा बाळगल्याचे सांगत बॅग तपासणी करुन हातचलाखी appeared first on बहुजननामा.