Header

Pune Crime News | पुणे-वारजे माळवाडी क्राईम न्यूज : वारजे पोलिस स्टेशन – पूर्ववैमनस्यातून गुंडांचा तलवारीने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

Pune Crime News | पुणे-वारजे माळवाडी क्राईम न्यूज : वारजे पोलिस स्टेशन – पूर्ववैमनस्यातून गुंडांचा तलवारीने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | आण्णा डोळसे कुठे आहे, असे विचारल्यानंतर माहिती नसल्याचे सांगितल्यावरुन गुंडांच्या टोळक्याने तरुणावर तलवारीने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. (Pune Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याबाबत चेतन मारुती शेडगे Chetan Maruti Shedge (वय २४, रा. रामनगर, वारजे) यांनी वारजे पोलीस स्टेशनमध्ये (Warje Malwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १५३/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गौरव संजय शेळके Gaurav Sanjay Shelke (वय २१, रा. वारजे), अभिषेक नवनाथ संकट Abhishek Navnath Sankat (वय १९, रा. रामनगर, वारजे), सचिन शंकर दळवी Sachin Shankar Dalvi (वय २३, रा. दांगट पाटीलनगर) यांना अटक केली आहे. त्यांचे साथीदार ओंकार मांढरे, रोहन पाटोळे, साहील बल्लाळ, आमिश धावरे यांच्यावर गुन्हा दाखल केला असून सर्व जण रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminal) आहेत.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र कृष्णा शिंगाडे हे १६ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता रामनगरमधील प्रणव सुपर मार्केटजवळ बसले होते. यावेळी आरोपी तलवार, लोखंडी हत्यार घेऊन तेथे आले. सचिन दळवी याने फिर्यादींना आण्णा डोळसे कुठे आहे, असे विचारले. त्यावर फिर्यादी यांनी माहिती नाही, असे उत्तर दिले. फिर्यादी व आरोपीच्या टोळीतील वादामुळे आरोपींनी फिर्यादी यांच्या हातावर, दंडावर, कमरेच्या वर तलवारीने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांचा मित्र कृष्णा शिंगाडे याने अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही जखमी करण्यात आले. पोलीस निरीक्षक बागवे तपास करीत आहेत.

 

 

Web Title :-  Pune Crime News | Pune-Warje Malwadi Crime News : Warje Police Station – Gangsters attempt to kill by stabbing them with swords due to prior enmity

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political News | अजितदादा भाजपसोबत जाणार? राष्ट्रवादीचे आमदार म्हणाले – ‘परिस्थितीनुसार निर्णय…’

Maharashtra Political News | ‘अजितदादाच करेक्ट कार्यक्रम करतील’, शिवसेना मंत्र्यांचे महत्त्वाचं विधान

Appasaheb Dharmadhikari | उष्माघाताने श्री सेवकांचा झालेला मृत्यू माझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक, याचे राजकारण होऊ नये – आप्पासाहेब धर्माधिकारी

Bombay High Court | मुंबई हायकोर्टाचा ठाकरे गटाला दणका तर शिंदे सरकारला दिलासा; BMC मध्ये 227 वॉर्ड राहणार

 

The post Pune Crime News | पुणे-वारजे माळवाडी क्राईम न्यूज : वारजे पोलिस स्टेशन – पूर्ववैमनस्यातून गुंडांचा तलवारीने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article