Header

Pune Crime News | दुप्पट पैसे दिल्यानंतरही ३ रुम आणि २ लाखांची मागणी करणार्‍या सराईत गुंडावर खंडणीचा गुन्हा दाखल

Pune Crime News | दुप्पट पैसे दिल्यानंतरही ३ रुम आणि २ लाखांची मागणी करणार्‍या सराईत गुंडावर खंडणीचा गुन्हा दाखल

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | व्याजाने घेतलेल्या पैशांच्या दुप्पट रक्कम दिल्यानंतरही होस्टेलच्या ३ रुमचा ताबा व २ लाख रुपये न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी (Threats to kill) देणार्‍या सराईत गुंडासह दोघांवर खंडणीचा (Extortion Case) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

नाना बाळु कुदळे Nana Balu Kudale (वय ४०, रा. हनुमाननगर, केळेवाडी, कोथरुड) आणि मंगेश ऊर्फ गणेश भगवान दिघे Mangesh aka Ganesha Bhagwan Dighe (वय ३१, रा. राजीव गांधी पार्क, कोथरुड) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. नाना कुदळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. जितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली होती.

 

याप्रकरणी एका ३२ वर्षाच्या व्यावसायिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात (kothrud Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ९०/२३) दिली आहे. हा प्रकार कोथरुडमधील मोहन मिनी मार्केट शेजारी १६ एप्रिल २०२२ ते ३० मार्च २०२३ दरम्यान घडला. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आर्थिक अडचण असल्यामुळे त्यांनी एप्रिल २०२२
मध्ये गणेश दिघे याच्या मध्यस्थीने नाना कुदळे याच्याकडून ७ लाख रुपये १० टक्के दरमहा व्याजाने घेतले होते.
त्यांनी मुद्दल, व्याज व व्याजावरील दंड असे सर्व मिळून एकू १३ लाख ८१ हजार रुपये परत केले.
तरीही नाना कुदळे हा आणखी पैशांची मागणी करत होता. ३० मार्च रोजी तो फिर्यादीच्या होस्टेलवर आला.
त्याने तेथील सीसीटीव्हीची तोडफोड करुन ३ रुमचा ताबा देण्याची व २ लाख रुपये देण्याची मागणी केली.
ते न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या धमकीमुळे फिर्यादी यांनी घाबरुन पोलिसांकडे धाव घेतली.
पोलीस उपनिरीक्षक चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :-  Pune Crime News | A case of extortion has been filed against the inn goon who demanded 3 rooms and 2 lakhs even after paying double the amount

 

हे देखील वाचा :

Summer Skin-Care Routine | ‘हि’ 12 उत्पादने तुमच्या त्वचेला उष्णते पासून वाचवू शकतात. जाणून घ्या काय आहेत ते…

Ahmednagar Crime News | झेंडा लावण्यावरुन अहमदनगरमध्ये दोन गटात दंगल; ६ जण जखमी, १६ जणांना केली अटक

Mumbai Mantralaya News | पोलीस पत्नीचा आवाज सरकारपर्यंत पोहोचलाच नाही; मंत्रालयासमोर विषप्राशन केलेल्या महिलेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू

 

The post Pune Crime News | दुप्पट पैसे दिल्यानंतरही ३ रुम आणि २ लाखांची मागणी करणार्‍या सराईत गुंडावर खंडणीचा गुन्हा दाखल appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article