Header

Pune Pimpri Chinchwad Crime Branch News | पुणे पिंपरी-चिंचवड क्राईम ब्रँच : वाकड पोलिस स्टेशन – आयपीएल क्रिकेट मॅचवर बेटिंग घेणार्‍या 2 बुक्कींना अटक

Pune Pimpri Chinchwad Crime Branch News | पुणे पिंपरी-चिंचवड क्राईम ब्रँच : वाकड पोलिस स्टेशन – आयपीएल क्रिकेट मॅचवर बेटिंग घेणार्‍या 2 बुक्कींना अटक

पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन Pune Pimpri Chinchwad Crime Branch News | वाकड पोलिस स्टेशनच्या (Wakad Police Station) हद्दीतील एका उच्चभ्रु सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट मॅचवर बेटिंग घेणार्‍या दोघांना (IPL Cricket Betting Arrest) पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या क्राईम ब्रँचच्या युनिट-2 ने (Pune Pimpri Chinchwad Crime Branch News) छापा टाकून अटक केली आहे. त्यांच्याकडून 3 मोबाईल, 1 नोटबुक आणि इतर ऐवज जप्त करण्यात आला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

हरीश दयालदास गुलानी Harish Dayaldas Gulani (46, धंदा – रेशन दुकान, रा. विजयनगर, काळेवाडी) आणि कमल गुरमुखदास सचदेव Kamal Gurmukhdas Sachdev (49, धंदा – मधुर कुरियर सर्व्हिस, रा. कापसे आळी, पिंपरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. वाकड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका उच्चभ्रु सोसायटीमध्ये काही जण आयपीएल क्रिकेट मॅचवर मोठया प्रमाणावर बेटिंग घेत असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-2 ला मिळाली होती.

 

प्राप्त माहितीची खातरजमा करून पोलिसांनी सदरील उच्चभ्रु सोसायटीच्या एका फ्लॅटवर छापा टाकला. त्यावेळी हरीश गुलानी आणि कमल सचदेव हे क्रिकेट लाईव्ह गुरू (Cricket Live Guru App) नावाच्या अ‍ॅपवर मॅच पहात होते. त्या अ‍ॅपवर प्रक्षेपणापुर्वी एक बॉल अगोदर दिसते. त्याचा फायदा घेवून ते लोकांकडून क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन सट्टा (Online IPL Cricket Betting) घेवून पुढे 2 बुकींना पाठवत होते. त्यांच्याकडून 3 मोबाईल, 1 नोटबुक, जुगाराची साधने असा एकुण 25 हजार 15 रूपयाचा ऐवज प्त करण्यात आला आहे. दोघांविरूध्द वाकड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापुर्वी देखील गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने 6 बुकींना अटक केलेली आहे. त्यांच्याविरूध्द पिंपरी पोलिस स्टेशन (Pimpri Police Station) आणि चिंचवड पोलिस स्टेशनमध्ये (Chinchwad Police Station) गुन्हे दाखल आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime Branch News)

 

सदरील कारवाई पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे (IPS Vinay Kumar Chaubey), सह पोलिस आयुक्त मनोज लोहिया (IPS Manoj Lohiya), अप्पर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे (IPS Dr Sanjay Shinde), पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे (DCP Swapna Gore),  सहाय्यक आयुक्त पद्माकर घनवट (ACP Padmakar Ghanwat ) यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-2 चे पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम (Police Inspector Jitendra Kadam), पोलिस उपनिरीक्षक गणेश माने (PSI Ganesh Mane), पोलिस अंमलदार जयवंत राऊत, प्रमोद वेताळ, देवा राऊत, सागर अवसरे यांच्या पथकाने केली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :-  Pune Pimpri Chinchwad Crime Branch News | Wakad Police Station – 2 bookies arrested for betting on IPL cricket matches

 

हे देखील वाचा :

Maharashtra Industries Minister Uday Samant | उद्योग मंत्री उदय सामंत : रांजणगांव एमआयडीसी – इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल

Pune Mahavitaran News | महावितरणच्या बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

Rupali Chakankar | ‘…म्हणून गौतमी पाटील व उर्फी जावेदवर कोणतीही कारवाई करता येत नाही’, रुपाली चाकणकर यांनी सांगितलं कारण

The post Pune Pimpri Chinchwad Crime Branch News | पुणे पिंपरी-चिंचवड क्राईम ब्रँच : वाकड पोलिस स्टेशन – आयपीएल क्रिकेट मॅचवर बेटिंग घेणार्‍या 2 बुक्कींना अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article