Header

Pune Police Crime Branch News | पुणे पोलिस क्राईम ब्रँच न्यूज : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून 55 लाखाच्या 162 दुचाकी जप्त, 17 जणांना अटक (Video)

Pune Police Crime Branch News | पुणे पोलिस क्राईम ब्रँच न्यूज : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून 55 लाखाच्या 162 दुचाकी जप्त, 17 जणांना अटक (Video)

पुणे : बहुजननामा ऑनलाईन  Pune Police Crime Branch News | पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने तब्बल 54 लाख 67 हजार रूपये किंमतीच्या 162 दुचाकी जप्त केल्या आहेत. त्यापैकी सर्वाधिक दुचाकी या युनिटज्ञ 6 ने जप्त केल्या असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar), सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी युनिट-6 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रजनिश निर्मल (Sr PI Rajnish Nirmal) आणि इतर अधिकारी उपस्थित होते. (Pune Police Crime Branch News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) आणि सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik) यांनी गुन्हे शाखेस वाहन चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध करून व गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याचा सुचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखेतील युनिट-6, युनिट-5, युनिट-4, युनिट-2 आणि दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक-2 यांनी विशेष माहिम राबविण्यास सुरूवात केली होती.

 

गुन्हे शाखेतील युनिट-6 कडील पोलिस उपनिरीक्षक सुरेश जायभाय (PSI Suresh Jaybhay), पोलिस अंमलदार नितीन मुंडे (Police Nitin Munde)आणि पोलिस अमंलदार सचिन पवार (Police Sachin Pawar) तसेच त्यांचे इतर सहकारी गेल्या एक महिन्यापासुन लातूर (Latur), धाराशिव (Dharashiv), आणि बीड (Beed) परिसरात वेशांतर करून गोपनियरित्या तपास करीत होते. त्यावेळी युनिट-6 च्या पथकास काहीजण हे धाराशिव जिल्हयातील गोविंदपुर (ता. कळंब) येथे चोरीच्या मोटारसायकली विक्री करण्यास येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिस पथकाने सचिन प्रदिप कदम (32, रा. देवधानोरा, ता. कळंब, जि. धाराशिव), अजय रमेशराव शेंडे (32, रा. मु.पो. सहजपुर म्हस्कोबा चौक, ता. दौंड, पुणे), परमेश्वर भैरवनाथ मिसाळ (28, रा. गोविंदपुर, ता. कळंब, जि. धाराशिव) आणि युवराज सुदर्शन मुंढे (23, रा. गोविंदपुर) यांना अटक केली. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता अजय शेंडे व शिवाजी गरड हे चोरीच्या मोटारसायकली विक्रीसाठी देत असल्याचे समजले. ग्रामीण भागातील आर्थिकदृष्टया परवडेल व वापरासाठी उपयुक्त ठरतील अशा दुचाकी ते लोकांना विकत होते. पोलिसांनी सखोल चौकशी करून त्यांच्याकडून एकुण 100 मोटारसायकली जप्त केल्या. आरोपी अजय शेंडेविरूध्द 15 गुन्हे दाखल आहेत.

 

 

ही कारवाई अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सुनिल पवार, सहाय्यक पोलिस आयुक्त नारयण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक रजनिश निर्मल, पोलिस उपनिरीक्षक सुरेश जायभाय, पोलिस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, पोलिस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, नितीन मुंडे, सचिन पवार, कानिफनाथ कारकिले, बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, प्रतिक लाहीगुडे, प्रमोद मोहिते, ऋषीकेश व्यवहारे, ऋषीकेश टिळेकर, ऋषीकेश ताकवणे, नितीन धाडगे, ज्योती काळे, अश्फाक मुलाणी आणि सुहास तांबेकर यांच्या पथकाने केली आहे. (Pune Police Crime Branch News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

युनिट-5 च्या पथकाने आरोपी संकेत नामदेव भिसे (23, रा. विनम्र सोसायटी, शेवाळवाडी, पुणे), आदित्य बाळु मुळेकर (20, रा. माळवाडी, हडपसर) आणि वैभव नागनाथ बिनवडे (20, रा. गल्ली नं. 16, सय्यदनगर, हडपसर) यांना अटक केली. त्यांच्याकडून 5 लाख 40 हजार रूपये किंमतीच्या 14 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपी वैभव बिनवडे हा सराईत असुन त्याच्याविरूध्द 8 गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उल्हास कदम, सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलिस अंमलदार रमेश साबळे, प्रताप गायकवाड, दया शेगर, विनोद शिवले, शशिकांत नाळे, अकबर शेख आणि अमित कांबळे यांच्या पथकाने केली आहे.

 

 

युनिट-4 च्या पोलिस पथकाने राहुल राजेंद्र पवार (21, रा. आव्हाळवाडी रोड, वाघोली, पुणे. मुळ रा. भिल्लारवाडी, जिंती, ता.जि. सोलापुर), गौरव उर्फ पिन्टया मच्छिंद्र कुसाळे (38, रा. सर्व्हे नंबर 10, वडारवस्ती, येरवडा, पुणे), संतोष अशोक कुमार सक्सेना उर्फ समीर शेख (29, रा. सर्व्हे नंबर 8/1, कंजारभाट वस्ती, येरवडा, पुणे) आणि प्रशांत उर्फ पप्पु सुबराव ठोसर (36, रा. आंबेडकर वसाहत, औंध, पुणे) यांना अटक केली. त्यांच्याकडून 5 लाख 55 हजार रूपये किंमतीच्या 9 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गणेश माने, सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास जाधव, पोलिस उपनिरीक्षक जयदीप पाटील, पोलिस अंमलदार महेंद्र पवार, हरीष मोरे, प्रविण भालचिम, संजय आढारी, नागेश कुंवर, विनोद महाजन, स्वप्नील कांबळे, वैभव रणपिसे आणि मनोज सांगळे यांच्या पथकाने केली आहे.

 

दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक – 2 ने आरोपी किशोर उत्तम शिंदे (30, रा. वेताळ वस्ती, भापकरमळा, मांजुरी बु., पुणे), शाहिद कलिम शेख (19, रा. लेन नं. 1, दिगंबर नगर, वडगांव शेरी, पुणे), अमन नाना कनघरे (19, रा. आंबेडकर वसाहत, सुंदराबाई शाळेजवळ, चंदननगर, पुणे), नागनाथ आश्रुबा मेढे (29, रा. साईनाथनगर, वडगांवशेरी, पुणे) आणि ओंकार प्रफुल्ल टाटीया (22, रा. जैन मंदिर कात्रज, पुणे) यांना अटक केली तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून 5 लाख 67 हजार रूपये किंमतीच्या तब्बल 21 दुचाकी जप्त केल्या आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनिल पंधरकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक विवेक पाडवी, पोलिस उपनिरीक्षक गुंगा जगताप, पोलिस अंमलदार राजेश अंभगे, अशोक आटोळे, विनायक रामाणे, दत्तात्रय खरपुडे, शिवाजी जाधव, गणेश लोखंडे, सुदेश सपकाळ, अमोल सरतापे, संदीप येळे, राहुल इंगळे, विक्रांत सासवडकर आणि विनायक येवले यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

युनिट- 2 च्या पोलिसांनी आरोपी भगवान राजाराम मुंडे (32, रा. परभणी) याला अटक करून त्याच्याकडून 6 दुचाकी जप्त केल्या आहेत. पोलिसांनी इतर 13 वाहने देखील जप्त केली आहे. युनिट-2 च्या पोलिसांनी एकुण 4 लाख 65 हजार रूपये किंमतीच्या एकुण 19 दुचाकी जप्त केल्या आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल मोहिते, पोलिस अंमलदार मोहसिन शेख, उत्तम तारू, विनोद चव्हाण, विजय पवार, प्रमोद कोकणे, कादीर शेख, पुष्पेंद्र चव्हाण आणि समीर पटेल यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

 

पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुणे शहरातील 122, पुणे ग्रामीणमधील 10, पिंपरी चिंचवडमधील 6, सोलापूर ग्रामीणमधील 5,
सोलापूर शहरातील 2, धाराशिवमधील 3, वाशिममधील 5, अहमदनगरमधील 5, बीडमधील 3 आणि जालना जिल्ह्यातील 1 असे एकुण 162 गुन्हे उघडकीस आणुन 162 दुचाकी जप्त केल्या आहेत. त्यामध्ये 68 हिरो होंडा स्प्लेंडर, 20 हिरो होंडा डिलक्स, 12 हिरो पॅशन, 14 होंडा अ‍ॅक्टिव्हा, 10 बजाज पल्सर, 5 होंडा सीबी शाईन, 5 टीव्हीएस जुपीटर, 3 रॉयल इन्फील्ड बुलेट, 3 बजाज डिस्कव्हर, 2 यामाहा मोटारसायकल, 3 सुझुकी मोपेड, 3 डिओ मोपेड, 3 हिरो मेट्रो, 2 होंडा सीबीझेड, 2 होंडा ड्रीम नियो आणि होंडा हॉर्नेट, होंडा ग्लॅमर, होंडा करिश्मा, होंडा ग्राजिया, अ‍ॅव्हेटर ड्रम मोपेड, सीडी डॉन व स्कुटी पेप प्रत्येकी 1 चा समावेश आहे.

 

 

सन 2008 नंतरची गुन्हे शाखेची सर्वात मोठी कारवाई

पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने सन 2008 मध्ये अशाच प्रकारची धडक कारवाई करत 110 दुचाकी जप्त केल्या होत्या. तत्कालीन पोलिस निरीक्षक आणि सध्याचे सहाय्यक पोलस आयुक्त सुनिल पवार आणि त्यांच्या पथकाने सन 2008 मध्ये ती कारवाई केली आहे.
त्यानंतर पहिल्यांदाच एवढया मोठया प्रमाणावर गुन्हे शाखेने धडक कारवाई करत तब्बल 162 दुचाकी जप्त केल्या आहेत. त्यामध्ये गुन्हे शाखेच्या युनिट-6 ने 100, युनिट-5 ने 14, युनिट-4 ने 9, दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक-2 ने 21 आणि युनिट-2 ने 19 दुचाकींचा समावेश आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :-  Pune Police Crime Branch News | Crime Branch of Pune Police seized 162 bikes worth 55 lakhs,
17 people were arrested (Video)

 

हे देखील वाचा :

Barsu Refinery Project | बारसूतील आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित; जिल्हाधिकाऱ्यांचे चर्चेचे आवाहन, मात्र ग्रामस्थांनी फिरवली पाठ

TDM Marathi Movie | पैसावसूल ! रोमान्स, ऍक्शन अन् कॉमेडीचा तडका असलेला ‘टीडीएम’ प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाने पाहावाच

Barsu Refinery Project | ‘खोटे गुन्हे दाखल करुन प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केला तर…’, बारसू प्रकरणावरुन काँग्रेसचा सरकारला इशारा

CM Eknath Shinde | बारसू प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, म्हणाले-‘स्थानिकांच्या संमतीशिवाय कोणताही प्रकल्प करणार नाही’ (व्हिडिओ)

 

The post Pune Police Crime Branch News | पुणे पोलिस क्राईम ब्रँच न्यूज : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून 55 लाखाच्या 162 दुचाकी जप्त, 17 जणांना अटक (Video) appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article