Header

S. Balan Cup T20 League | चौथी ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा ! एमईएस क्रिकेट क्लब संघ बाद फेरीत

S. Balan Cup T20 League | चौथी ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा ! एमईएस क्रिकेट क्लब संघ बाद फेरीत

पुणे : बहुजननामा ऑनलाईन  पुनित बालन ग्रुप (Punit Balan Group) तर्फे आयोजित चौथ्या ‘एस. बालन करंडक’ (S. Balan Cup T20 League) अजिंक्यपद टी-२० आंतरक्लब क्रिकेट २०२३ स्पर्धेत अर्थव शिंदे याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर एमईएस क्रिकेट क्लब संघाने साईदिप हिरोज्चा ६ गडी राखून पराभव करत सलग तिसर्‍या विजयासह बाद फेरी गाठली. (S. Balan Cup T20 League)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

सहकारनगर येथील शिंदे हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना साईदिप हिरोज् संघाने १२७ धावांचे आव्हान उभे केले. सचिन सोळंकी (३६ धावा) आणि आयुष वर्तक (३० धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. एमईएस संघाच्या अर्थव शिंदे याने १९ धावात ४ गडी टिपले. गौरव जोत्शी (२-१९) आणि दिपक डांगी (२-२६) यांनीही दुसर्‍या बाजूने अचूक गोलंदाजी केली. हे आव्हान एमईएस क्रिकेट क्लबने १७.५ षटकामध्ये आणि ४ गडी गमावून पूर्ण केले. कर्णधार अजित गव्हाणे याने नाबाद ३८ धावांची तर, अदवय सिधये याने ३१ धावांची खेळी करून संघाचा विजय साकार केला. (S. Balan Cup T20 League)

 

स्पर्धेमध्ये अ गटातून हेज् अँड सॅचे, हेमंत पाटील क्रिकेट अ‍ॅकॅडमी; ब गटातून माणिकचंद ऑक्सिरीच व न्युट्रीलिशियस;, क गटातून आयोजन पुनित बालन ग्रुप आणि पुणे पोलिस तर, ड गटातून एमईएस क्रिकेट क्लब आणि साईदिप हिरोज् या संघांनी उपांत्यपुर्व फेरीतील आपला प्रवेश निश्‍चित केला.

 

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः

 

साईदिप हिरोज्ः १९.१ षटकात १० गडी बाद १२७ धावा (सचिन सोळंकी ३६, आयुष वर्तक ३०, अर्थव शिंदे ४-१९, गौरव जोत्शी २-१९, दिपक डांगी २-२६) पराभूत वि. एमईएस क्रिकेट क्लबः १७.५ षटकात ४ गडी बाद १२९ धावा (अजित गव्हाणे नाबाद ३८, अदवय सिधये ३१, हर्षित सेठी २-१२); सामनावीरः अर्थव शिंदे;

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- S. Balan Cup T20 League | Fourth S. Balan Karandak’ Championship T20 Cricket Tournament! MES Cricket Club team in the knockout round

 

हे देखील वाचा :

Pune Covid Update | पुण्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ, रुग्णालयातील कोरोना वॉर्ड पुन्हा सुरु होणार

Maharashtra Politics News | आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत शिंदे गटाच्या महिला नेत्याचा खळबळजनक दावा, म्हणाल्या- ‘उद्धव ठाकरे भेटून गेले अन्…’

MP Navneet Rana | ‘उद्धव ठाकरे, तुम किस खेत की मूली हो’, भर सभेत नवनीत राणांचा हल्लाबोल

 

The post S. Balan Cup T20 League | चौथी ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा ! एमईएस क्रिकेट क्लब संघ बाद फेरीत appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article