Header

S. Balan Cup T20 League | चौथी ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा; पुनित बालन ग्रुप, पुणे पोलिस संघ उपांत्य फेरीत !!

S. Balan Cup T20 League | चौथी ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा; पुनित बालन ग्रुप, पुणे पोलिस संघ उपांत्य फेरीत !!

पुणे : बहुजननामा ऑनलाईन पुनित बालन ग्रुप (Punit Balan Group) तर्फे आयोजित चौथ्या ‘एस. बालन करंडक’ (S. Balan Cup T20 League) अजिंक्यपद टी-२० आंतरक्लब क्रिकेट २०२३ स्पर्धेत पुनित बालन ग्रुप आणि पुणे पोलिस (Pune Police Team) या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. (S. Balan Cup T20 League)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

सहकारनगर येथील शिंदे हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत मेहूल पटेल याच्या नाबाद ९१ धावांच्या जोरावर पुनित बालन ग्रुप संघाने न्युट्रीलिशियस् संघाचा ६३ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पुनित बालन ग्रुपने १७८ धावांचे आव्हान उभे केले. मेहूल पटेल याने ६३ चेंडूत ८ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ९१ धावांची खेळी केली. दिग्विजय जाधव याने ५६ धावांची खेळी केली. मेहूल आणि दिग्विजय यांनी तिसर्‍या गड्यासाठी ७९ चेंडूत ११८ धावांची भागिदारी केली. या आव्हानासमोर न्युट्रीलिशियस संघाचा डाव ११५ धावांवर मर्यादित राहीला.

 

अमोल पायगुडे याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर पुणे पोलिस संघाने माणिकचंद ऑक्सिरीच संघाचा ५ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना माणिकचंद ऑक्सिरीचने १२५ धावा धावफलकावर लावल्या. अभिनव तिवारी याने ५२ धावांची खेळी केली. पुणे पोलिसच्या अमोल पायगुडे याने १६ धावात ३ गडी टिपले. हे आव्हान पुणे पोलिस संघाने १३.२ षटकात व ५ गडी गमावून पूर्ण केले. करण शाह (३४ धावा) आणि परिक्षीत (२४ धावा) यांनी संघाचा विजय सोपा केला. (S. Balan Cup T20 League)

 

सामन्याचा संक्षिप्त निकालः उपांत्यपुर्व फेरीः
पुनित बालन ग्रुपः २० षटकात ४ गडी बाद १७८ धावा (मेहूल पटेल नाबाद ९१ (६३, ८ चौकार, ५ षटकार), दिग्विजय जाधव ५६ (४०, ९ चौकार, २ षटकार), आत्मन पोरे २-२२);(भागिदारीः तिसर्‍या गड्यासाठी मेहूल आणि दिग्विजय यांच्यात ११८ (७९) वि.वि. न्युट्रीलिशियसः १८.१ षटकात १० गडी बाद ११५ धावा (श्रेयस वालेकर २८, गुरवीर सिंग सैनी २८, यश खळदकर ३-३८); सामनावीरः मेहूल पटेल;

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

माणिकचंद ऑक्सिरीचः २० षटकात १० गडी बाद १२५ धावा (अभिनव तिवारी ५२ (३९, ३ चौकार, ३ षटकार), अनिकेत कुंभार १८, अमोल पायगुडे ३-१६, अक्षय जांभेकर २-१९) पराभूत वि. पुणे पोलिसः १३.२ षटकात ५ गडी बाद १३० धावा (करण शाह ३४, परिक्षीत २४, प्रशांत गायकवाड १९, हर्ष संघवी ३-२२); सामनावीरः अमोल पायगुडे;

 

Web Title :- S. Balan Cup T20 League | Fourth S. Balan Karandak’ Championship T20 Cricket Tournament; Punit Balan Group, Pune Police Team In Semi Final !!

 

हे देखील वाचा :

Gulabrao Patil | ‘…तर परमेश्वर तुमचं भलं करो’, गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

Maharashtra Politics News | ‘या’ एका कारणामुळे शिंदे-ठाकरे एकत्र येणं अशक्य, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याचं मोठं विधान

Pune Crime News | पुण्यातील पोलिस उपनिरीक्षक शशिकांत पवार निलंबीत, जाणून घ्या प्रकरण

 

The post S. Balan Cup T20 League | चौथी ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा; पुनित बालन ग्रुप, पुणे पोलिस संघ उपांत्य फेरीत !! appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article