Header

Uddhav Thackeray | आता कुणाला जोडे मारणार आहात?, उद्धव ठाकरेंची चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी (व्हिडिओ)

Uddhav Thackeray | आता कुणाला जोडे मारणार आहात?, उद्धव ठाकरेंची चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी (व्हिडिओ)

मुंबई :  बहुजननामा ऑनलाईन  – बाबारी पाडण्यात शिवसेनेची (Shivsena) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची भूमिका नव्हती असा दावा भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (BJP Leader Chandrakant Patil) यांनी केला होता. पाटील यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. तसेच एकतर चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा (Resignation) घ्या किंवा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे म्हणाले, काल गोमूत्रधारी चंद्रकांत पंडीत आणि चंद्रकांत पाटील ह्या आपल्या बाबरीच्या (Babri Masjid) खंदकातून बाहेर पडले. असे अनेक उंदीर बाहेर पडत आहेत. ज्यावेळी बाबरी पाडली त्यावेळी हे उंदीर बिळात लपले होते. जेव्हा बाबरी पाडली तेव्हा तिथे आपले आत्ताचे माननीय पंतप्रधान हे त्यावेळी बांगलादेशच्या सत्याग्रहात सामील होते. कदाचीत बाबरीच्या आंदोलनात ते हिमालयात असावेत. पण त्यांचंही नाव कुठं आलेलं नव्हतं. तेव्हाचे भाजपचे म्हणजे भरकटलेल्या भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष सुंदरसिंह भंडारी (Sundersingh Bhandari) त्यांनी आपल्या अंगलट काही येयला नको म्हणून जाहीर केलं की बाबरी पाडण्यामध्ये भाजप नसून हे काम शिवसैनिकांनी केल्याचे जाहीर केलं होतं.

 

 

जेव्हा ही बातमी आली त्यावेळी मी मातोश्रीवर होतो, एक फोन आला होता. पळत जाऊन बाळासाहेबांना सांगितलं होतं, त्यांनी फोन उचलला आणि शिवसैनिकांनी बाबरी पाडली असेल तर आम्हाला अभिमान आहे. हे कसलं नपुंसक नेतृत्व आहे, असं नेतृत्व देशाला लाभलं तर या देशात हिंदू कधीच उभाच राहू शकणार नाही.

 

काल बातमी वाचली त्यात मुघलांचा इतिहास पुसला जात आहे. पण आता हा इतिहास पुसताना हिंदूंचा इतिहासही पुसला जाण्याची भीती आहे.
ज्यांच्याकडे शौर्य नसतं त्यांना शौर्य करता येत नाही. भाजपकडे शौर्य नाही. मुंबईत दंगल झाली ती शिवसैनीकांनी वाचवली. गुजरातमध्ये दंगल झाली ती वेगळी होती. त्यावेळी पोलीस त्यांच्यासोबत होते असेही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

राज्यपाल आणि मुख्यमंत्री पद हे मोठे आहे. पण आमचे हे मिंधे बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून त्यांच्यासोबत गेले. त्यांनी चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घेतला पाहिजे नाहीतर स्वत: मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे. आता जे कुणाला जोडे मारणार आहे, किंवा त्याच जोड्याने तोंड फोडून घेणार आहात. बाळासाहेबांचा एवढा अपमान केला आहे. तुम्हाला काय चाटायचं ते चाटा पण बाळसाहेबांच नाव घेऊ नका. हे बाळासाहेबांचे विचार नाही. ज्या मस्तीत चंद्रकांत पाटील बोलत आहे, त्यांनी अडवाणींची मुलाखत पाहावी असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला.

 

 

Web Title :-  Uddhav Thackeray | uddhav thackeray live update on babri masjid demolition case chandrakant patil

 

हे देखील वाचा :

Chandrashekhar Bawankule | ‘बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचे चंद्रकांतदादांचे ते विधान चुकीचे’, भाजपने स्पष्टच सांगितलं

Satyashodhak Motion Poster Marathi Movie | सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते “सत्यशोधक” चित्रपटाच्या मोशन पोस्टरचे अनावरण

Jayant Patil | ‘… तर पुन्हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल’ – जयंत पाटील

 

The post Uddhav Thackeray | आता कुणाला जोडे मारणार आहात?, उद्धव ठाकरेंची चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी (व्हिडिओ) appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article