Header

Vision Cup ODI (50 Overs) Cricket Tournament | ‘व्हिजन करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; सिंहगड इलेव्हन, सिंधुदूर्ग इलेव्हन संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत !!

Vision Cup ODI (50 Overs) Cricket Tournament | ‘व्हिजन करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; सिंहगड इलेव्हन, सिंधुदूर्ग इलेव्हन संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत !!

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – व्हिजन स्पोर्ट्स सेंटर तर्फे आयोजित ‘व्हिजन करंडक’ अजिंक्यपद एकदिवसीय (५० षटके) क्रिकेट (Vision Cup ODI (50 Overs) Cricket Tournament) स्पर्धेत सिंहगड इलेव्हन आणि सिंधुदूर्ग इलेव्हन या संघांनी अव्वल गुण आणि सरस धावगतीच्या आधारे स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. (Vision Cup ODI (50 Overs) Cricket Tournament)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

सनसिटी रोड येथील व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमी मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत सिंधुदूर्ग इलेव्हन आणि रायगड इलेव्हन या संघांतील सामना अंतिम फेरीमध्ये पात्र ठरण्यासाठी करो-या-मरो असा होता. रायगड इलेव्हन संघाला सामना जिंकणे आवश्यक होता तर, सिंधुदूर्ग इलेव्हन संघाला सामना सरस धावगतीने जिंकणे आवश्यक होते. पहिल्यांदा फलंदाजी करताना सिंधुदूर्ग इलेव्हनने ४२ षटकात ७ गडी गमावून २५० धावा धावफलकावर लावल्या. निलेश माळी याने ५७ धावांची तर, विवेकसिंग चांडेल याने ५४ धावांची खेळी केली. तसेच हेमंत राठोड (४९ धावा), कर्णधार ओंकार मोगलगिद्दीकर (नाबाद २१ धावा) आणि शुभम नायडू (२६ धावा) यांनी धावांचे योगदान दिले.

 

या आव्हानाचा पाठलाग करताना रायगड इलेव्हन संघाचा डाव ३०.३ षटकात व १३६ धावांवर मर्यादित राहीला. शंतनु आठवले (३४ धावा) आणि गणेश जोशी (३६ धावा) यांनी छोट्या खेळी करत संघाचा पराभव टाळण्याचा प्रयत्न केला. कर्णधार ओंकार मोगलगिद्दीकर याने ३७ धावात ३ गडी बाद करून विजयात मोलाचा वाटा उचलला. ओंकार पेटकर (२-१४) यानेही अचूक गोलंदाजी केली. सिंधुदूर्ग संघाने ११४ धावांनी जिंकत २ गुण आणि सरस धावगतीसह अंतिम फेरीतील आपले स्थान निश्‍चित केले. सामनावीर किताब कर्णधार ओंकार मोगलगिद्दीकर याला देण्यात आला. (Vision Cup ODI (50 Overs) Cricket Tournament)

 

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
सिंधुदूर्ग इलेव्हनः ४२ षटकात ७ गडी बाद २५० धावा (निलेश माळी ५७ (६७, ८ चौकार, १ षटकार), विवेकसिंग चांडेल ५४ (५७, ६ चौकार, २ षटकार), हेमंत राठोड ४९, ओंकार मोगलगिद्दीकर नाबाद २१, शुभम नायडू २६, दिग्विजय पाटील २-३०);(भागिदारीः दुसर्‍या गड्यासाठी शुभम आणि निलेश ७४ (१००); पाचव्या गड्यासाठी विवेक आणि हेमंत ८६ (६५) वि.वि. रायगड इलेव्हनः ३०.३ षटकात १० गडी बाद १३६ धावा (शंतनु आठवले ३४, गणेश जोशी ३६, ओंकार मोगलगिद्दीकर ३-३७, ओंकार पेटकर २-१४); सामनावीरः ओंकार मोगलगिद्दीकर;

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :-  Vision Cup ODI (50 Overs) Cricket Tournament | ‘Vision Trophy’ Championship Cricket Tournament; Sinhagad XI, Sindhudurg XI teams fight for title !!

 

हे देखील वाचा :

Nashik-Jalgaon-Bhusawal ACB Trap | नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : जळगाव- भुसावळ तहसिल कार्यालय – 12 हजाराच्या लाच प्रकरण कोतवालासह दोघे अ‍ॅन्टी करप्शनच्या ‘रडार’वर

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : विमाननगर पोलिस स्टेशन – फिनीक्स मॉलमधील स्टोअरमध्ये 20 वर्षीय तरूणीच्या प्रायव्हेट पार्टचे व्हिडीओ शुटिंग करणार्‍याला अटक

Ajit Pawar | ‘आमचं वकीलपत्र घेऊ नका’, अजित पवारांनी नाव न घेता संजय राऊतांना फटकारलं

Ali Daruwala | अल्पसंख्यक आयोगाच्या सल्लागार पदी अली दारूवाला यांची नियुक्ती

 

The post Vision Cup ODI (50 Overs) Cricket Tournament | ‘व्हिजन करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; सिंहगड इलेव्हन, सिंधुदूर्ग इलेव्हन संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत !! appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article