Header

Maharashtra Cabinet Expansion | कोर्टाचा निकाल आला आता मंत्रिमंडळ विस्तार कधी?, बच्चू कडू म्हणाले – ‘आता विस्तार झाला नाही तर मग…’

Maharashtra Cabinet Expansion | कोर्टाचा निकाल आला आता मंत्रिमंडळ विस्तार कधी?, बच्चू कडू म्हणाले – ‘आता विस्तार झाला नाही तर मग…’

Maharashtra Cabinet Expansion | maharashtra cabinet expansion MLA bacchu kadu

अमरावती : बहुजननामा ऑनलाईन काल महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निकाल लागल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराची (Maharashtra Cabinet Expansion) चर्चा सुरु झाली आहे. अपक्ष आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. 20 किंवा 21 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं बच्चू कडू यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शब्द दिला आहे, त्यामुळे मलाही मंत्रिपद मिळणार, असा दावा त्यांनी केला. तसेच आता विस्तार झाला नाही तर मग 2024 नंतरच विस्तार (Maharashta Cabinet Expansion) होईल असंही बच्चू कडू यांनी सांगितलं. ते एका वृत्तवाहीनीशी बोलत होते.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

बच्चू कडू म्हणाले, माझ्या कानावर ज्या काही गोष्टी आल्या आहेत, त्यावरुन 20 किंवा 21 मे पर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) होऊ शकतो. मंत्रिमंडळ विस्तार हा आमच्यासाठी नाही तर जनतेसाठी महत्त्वाचा आहे. सध्या एका मंत्र्याकडे पाच-सहा खाती आहेत. त्यामुळे कारभार सांभाळताना अडचणी येत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार हा गरजेचा आहे. आता कोणालाही मंत्री करा, पण मंत्रिमंडळ विस्तार करा. आता मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही तर तो 2024 नंतरच होईल, असंही बच्चू कडू म्हणाले.

 

यावेळी बच्चू कडू यांनी सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निकालावर भाष्य केलं. काही बाजू सोडल्या तर
न्यायाच्या बाजूने निकाल झाला आहे. शिंदे आणि फडणवीस यांनी जे काही केले, कागदपत्र जमा केली,
ज्या पद्धतीने व्यूहरचना आखली, ते सगळं व्यवस्थित होते. त्यामुळे सत्तेच्या बाजूने निकाल लागला. विरोधी पक्षाकडून काही चुका झाल्या. पण जनतेला काम करणारा मुख्यमंत्री मिळाला आहे. त्यामुळे लोक खुश असल्याचे कडू यांनी म्हटले.

 

महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi Government) बच्चू कडू यांच्याकडे राज्यमंत्रीपद होतं.
परंतु शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार एकदाच झाला. त्यामुळे पहिल्या विस्तारामध्ये स्थान
न मिळालेल्या अनेक नेत्यांना दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात स्थान मिळेल अशी आशा आहे.
त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तार 20 किंवा 21 तारखेला होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Maharashtra Cabinet Expansion | maharashtra cabinet expansion MLA bacchu kadu

 

हे देखील वाचा :

Param Bir Singh Suspension Orders Revoked | शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील आरोप मागे, निलंबन देखील रद्द

Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | ‘पे फेअर करंडक’ अजिंक्यपद १३ वर्षाखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा ! एमजीएम क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा सलग दुसरा विजय; ब्रिलीयन्ट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी संघाची विजयी सलामी

Pune Pimpri Chinchwad Crime News | मावळमधील उद्योगपती व तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्यावर भरदिवसा गोळीबार, कोयत्याने वार करून खून

Devendra Fadnavis | ‘भाजपला नैतिकता शिकवायची ठरवली तर…’, देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना इशारा (व्हिडिओ)

 

The post Maharashtra Cabinet Expansion | कोर्टाचा निकाल आला आता मंत्रिमंडळ विस्तार कधी?, बच्चू कडू म्हणाले – ‘आता विस्तार झाला नाही तर मग…’ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article