Header

Nana Patole | राहुल गांधींना पंतप्रधान करायचंय त्यासाठी…, नाना पटोलेंनी सांगितली पुढची रणनीती

Nana Patole | राहुल गांधींना पंतप्रधान करायचंय त्यासाठी…, नाना पटोलेंनी सांगितली पुढची रणनीती

Nana Patole | nana patole strongly criticized the bjp government

सोलापूर : बहुजननामा ऑनलाइन –  काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पुन्हा एकदा भाजपवर (BJP)हल्लाबोल केला आहे. त्यांनी दोन हजारांच्या नोटबंदीवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी सरकारने ठरवलंच आहे की, सामान्य लोकांच्या खिशातले पैसे काढायचे. केंद्र सरकार (Central Government) देश विकून खात आहे. ज्याप्रमाणे इंग्रजांना हाकलले त्याप्रमाणे भाजपला हकलायचे आहे, असं नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

नाना पटोले (Nana Patole) पुढे म्हणाले, सोलापूरचे पुढचे खासदार हे सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) असणार आहेत. त्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपल्याला सुशीलकुमार शिंदे यांनाच खासदार करायचे आहे, असा निर्धार करुन कामाला लागावे. आपले सोलापूरातील दोनही खासदार निवडून आले पाहिजेत असे पटोले म्हणाले.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

यावेळी नाना पटोले यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना 2024 मध्ये देशाचे पंतप्रधान (Prime Minister) करायचे आहे. तर प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना आमदार करुन त्यांना मंत्री करायचे आहे. त्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील अकरा जागांवर आपलेच उमेदवार निवडून आले पाहिजेत. आजचं सरकार हे केवळ घोषणाबाजी करणारे सरकार आहे. घोषणाबाज पंतप्रधान पहिल्यांदा आपण पाहतोय. मात्र यापूर्वी काँग्रेस पंतप्रधान यांनी खूप काही दिले आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले.

Web Title : Nana Patole | nana patole strongly criticized the bjp government

The post Nana Patole | राहुल गांधींना पंतप्रधान करायचंय त्यासाठी…, नाना पटोलेंनी सांगितली पुढची रणनीती appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article