Header

NCP Chief Sharad Pawar Withdrew His Resignation | शरद पवारच गॉडफादर! त्यांनी राजीनामा मागे घेतला, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर कायम राहणार (Video)

NCP Chief Sharad Pawar Withdrew His Resignation | शरद पवारच गॉडफादर! त्यांनी राजीनामा मागे घेतला, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर कायम राहणार (Video)

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन  NCP Chief Sharad Pawar Withdrew His Resignation | ‘लोक माझे सांगाती’ (Lok Maze Sangati) या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमाच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कुठंतरी थांबलं पाहिजे, असं म्हणत राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सर्वांना एकच धक्का बसला. त्यानंतर ज्येष्ठ नेत्यांनी, पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांनी त्यांना वेगवेगळया मार्गाने राजीनामा मागे घेण्यासाठी विनंती केली होती. दरम्यान, आज शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला असून तेच राष्ट्रीय अध्यक्ष पदावर कायम राहणार आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

 

 

गेल्या दोन दिवसांपासुन घडत असलेल्या नाटयमय घडामोडीनंतर शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली
आणि त्यामध्ये आपण राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. नवीन अध्यक्ष नेमण्यासाठी शरद पवार यांनी सांगितल्याप्रमाणे समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्याचा एकमताने ठराव केला होता. शरद पवार यांची देशाला, राज्याला आणि पक्षाला गरज असल्याने त्यांनीच राष्ट्रीय अध्यक्ष पदावर कायम राहावे अशी भावना सर्वांनी व्यक्त केली होती.

 

 

अनेक नाटयमय घडामोडी घडल्यानंतर अखेर शरद पवार यांनी आज त्यांचा राजीनामा मागे घेतला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :-  NCP Chief Sharad Pawar Withdrew His Resignation | Sharad Pawar takes back his resignation as the national president of NCP

 

हे देखील वाचा :

Pune Police Crime Branch News | मोबाईल हिसकाविणार्‍या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, अल्पवयीन ताब्यात

Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | ‘पे फेअर करंडक’ अजिंक्यपद १३ वर्षाखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा ! क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी, ३० यार्डस् क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांचा सलग दुसरा विजय

Sunny XI Karandak | ‘सनी इलेव्हन करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! आर्यन क्रिकेट क्लब संघाचा सलग दुसरा विजय !!

 

The post NCP Chief Sharad Pawar Withdrew His Resignation | शरद पवारच गॉडफादर! त्यांनी राजीनामा मागे घेतला, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर कायम राहणार (Video) appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article