Header

Prashant Damle | अखिल भारतीय नाट्य परिषद निवडणूक : प्रशांत दामले यांचा भरघोस मतांनी विजय

Prashant Damle | अखिल भारतीय नाट्य परिषद निवडणूक : प्रशांत दामले यांचा भरघोस मतांनी विजय

Prashant Damle | prashant damle will president of akhil bharatiya marathi natya parishad prasad kambli

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Prashant Damle | पंचवार्षिक अखिल भारतीय नाट्य परिषद निवडणूकीचा निकाल (Election Results) आज अखेर जाहीर झाला. या परिषदेचं अध्यक्षपद नक्की कोणाला मिळणार याकडे साऱ्या नाट्यसृष्टीचे लक्ष लागले होते. आज झालेल्या मतमोजणीत अध्यक्षपदी प्रशांत दामले (Prashant Damle) यांची भरघोस मतांनी निवड झाली आहे. त्यांनी एकूण ६० पैकी ५० मतं मिळवून हा विजयश्री मिळवला आहे.

 

अध्यक्षपदासाठी प्रसाद कांबळी (Prasad Kambli) यांचे ‘आपलं पॅनल’ आणि प्रशांत दामले यांचं ‘रंगकर्मी समूह’ या दोन गटांमध्ये चुरसीची लढत बघायला मिळाली. प्रशांत दामले विरूद्ध प्रसाद कांबळी यामध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता साऱ्यांनाच होती. या संपूर्ण निवडणूकीत ‘रंगकर्मी नाटक समूहा’चे वर्चस्व पाहायला मिळाले.

 

कार्यकारिणीवर प्रशांत दामलेंच्या (Prashant Damle) ‘रंगकर्मी नाटक समूहा’चे वर्चस्व पाहायला मिळत आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ११ जणांची कार्यकारिणीवर निवड करण्यात आली आहे. यामध्ये सुशांत शेलार, गिरीश महाजन, विजय चौगुले, संदीप तेंडुलकर, दीपा क्षीरसागर, सविता मालपेकर, संदीप पाटील, विशाल शिंगाडे, विजयकुमार साळुंखे, संजय रहाटे, दीपक रेगें आदींचा समावेश आहे.

नाट्य निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी (Gurunath Dalvi) यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूकीसंदर्भात माहिती दिली. यासोबतच कोणत्या पदासाठी कोण निवडून आले तेही सांगितले. ते म्हणाले की,’नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी नरेश गडेकर यांची निवड झाली. कार्यवाहपदी अजित भुरे, तर कोषाध्यक्षपदी सतिश लोटके यांची निवड झाली आहे. उपाध्यक्ष उपक्रमपदी भाऊसाहेब भोईर यांची बिनविरोध निवड झाली.’

 

विजयी झालेले उमेद्वार

१.अध्यक्ष- प्रशांत दामले

२.सहकार्यवाह- समीर इंदुलकर, दिलीप कोरके, सुनील ढगे

३.उपाध्यक्ष – नरेश गडेकर

४.उपाध्यक्ष उपक्रम- भाऊसाहेब भोईर

५.खजिनदार- सतीश लोटके

 

पराभूत झालेले उमेद्वार

१.प्रसाद कांबळी

२.सुकन्या कुलकर्णी

३.ऐश्वर्या नारकर

४.अविनाश नारकर

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

Web Title : Prashant Damle | prashant damle will president of akhil bharatiya marathi natya parishad prasad kambli

Maharashtra Politics News | ‘अजितदादा… दंगलीचा मास्टरमाईंड तुमच्या समोर बसलेला’, भाजप आमदाराचा खळबळजनक आरोप (व्हिडिओ)

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : वानवडी पोलिस स्टेशन – खंडणी देण्यास नकार दिल्याने पान टपरीचालकाच्या कुटुंबाला गुंडांची मारहाण; बांबुने मारहाण करुन पत्नीचा केला हात फॅक्चर

Swati Sharad Mohol | छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त स्वारद फाऊंडेशनच्या स्वाती शरद मोहोळ यांच्याकडून महिलांसाठी शौर्यपीठ धर्मपीठ तुळापूर सहलीचे आयोजन

The post Prashant Damle | अखिल भारतीय नाट्य परिषद निवडणूक : प्रशांत दामले यांचा भरघोस मतांनी विजय appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article