Header

Pune Crime Fire News | वाघोलीतील मंडप साहित्याच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत 3 कामगारांचा होरपळून मृत्यु़

Pune Crime Fire News | वाघोलीतील मंडप साहित्याच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत 3 कामगारांचा होरपळून मृत्यु़

Pune Crime Fire News | 3 workers died in a massive fire at a mandap material warehouse in Wagholi Pune Crime News

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime Fire News | वाघोली येथील उबाळेनगरमधील (Ubale Nagar Wagholi) मंडपाचे साहित्य असलेल्या गोदामाला भीषण आग लागून त्यात ३ कामगारांचा होरपळून मृत्यु झाला (3 Worker Died In Fire Pune). जवळपास ४ तास ही आग धडधडत होती. या मंडपाचा शेजारीच ४०० सिलेंडरने (Gas Cylinder) भरलेले गोदाम होते. जवानांनी खबरदारी घेतल्याने आग पसरु न दिल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

 

वाघोली येथील उबाळेनगरमध्ये शुभ सजावट या मंडपाचे साहित्याचे मोठे गोदाम आहे. रात्री ११ वाजून ४३ मिनिटांनी या गोदामाला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यापाठोपाठ पुण्यातील ५ आणि (PMRDA) पीएमआरडीएचे ४ असे ९ अग्निशमन दलाची वाहने व जवान घटनास्थळी पोहचले़ तोपर्यंत आग भडकली होती.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

गोदामात लाकडी सामान मोठ्या प्रमाणावर असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी कमालीची शर्थ करावी लागत होती.
त्यात गोदामात असलेल्या ४ सिलेंडर एका पाठोपाठ फुटल्याने आग आणखीच भडकली. (Wagholi Fire News)

 

या गोदामाच्या शेजारीच ४०० सिलेंडरने भरलेले गोदाम आहे. ही लक्षात घेऊन सर्वप्रथम आग तिकडे पसरणार नाही,
याची काळजी अग्निशमन जवानांनी घेतली. तासाभराच्या प्रयत्न आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
त्यानंतर पहाटे पावणे चार वाजेपर्यंत आग विझविण्यात आली. अद्यापही तेथे कुलिंग करण्याचे काम सुरु आहे.
या आगीत गोदामातील ३ कामगारांचा होरपळून मृत्यु झाला. त्यांची नावे अद्याप समजू शकली नाही.
आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही.

 

 

Web Title :-  Pune Crime Fire News | 3 workers died in a massive fire at a mandap material warehouse in Wagholi Pune Crime News

 

हे देखील वाचा :

IPS Nilesh Ashtekar | आयपीएस निलेश अष्टेकर यांच्याविरूध्द पुण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल, शरीर सुखाची मागणी केल्याचा विधवा महिलेचा दावा

Pune Crime News | मोक्कातील आरोपी मित्राच्या जामिनाच्या पैशासाठी दान पेट्या फोडून चोरी करणार्‍यांना कोंढवा पोलिसांकडून अटक

Pranav Raorane | प्रणव रावराणे झळकणार ‘गुगल आई’ चित्रपटात ! दाक्षिणात्य निर्माता, दिग्दर्शकाचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

 

The post Pune Crime Fire News | वाघोलीतील मंडप साहित्याच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत 3 कामगारांचा होरपळून मृत्यु़ appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article